आटपाडी द्राक्ष बागेचे औषधामुळे नुकसान झालेले आहे
तरी सबंधित औषध विक्रेत्यावर कार्यवाही होणे बाबत शेतकरी हिंदुराव गणपत माने
आटपाडी :- श्री. हिंदुराव गणपत माने मु.पो.घानंद ता. आटपाडी जि. सांगली यांनी द्राक्ष बागेचे औषधामुळे नुकसान झालेले आहे तरी सबंधित औषध विक्रेत्यावर कार्यवाही होणे
बाबत असे पत्र पंचायत समिती आटपाडी कृषी विभाग यांना दिनांक 13/03/2023रोजी दिले होते त्या पत्रामध्ये त्या शेतकऱ्याने त्याची व्यथा कशाप्रकारे मांडली माझे गट नं.४२१ घानंद मध्ये द्राक्ष बाग २ एकर आहे. मी श्री.महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र.
नेलकरंजी या कृषी केंद्रातून द्राक्ष बाग केल्यापासून औषध घेत आहे. तरी श्री महालक्ष्मी कृषी कल्याण क्रेंद नेलकर्णीचे मालक मला बाग धरल्या पासून कोणते औषध मारायचेआहे व कधी मारायचे आहे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन करत होते,
व त्यंनी सांगितलेले औषध मी मारत होतो, द्राक्ष बाग धरल्यापासून ७० व्या दिवसी कडवट हे औषध फवारणी केल्यामुळे पूर्ण बागेतील द्राक्ष कडू लागत असल्याने या बागेला आलेला माल २५ ते ३० टन असून तो माल कडू असल्याने कोणताही व्यापारी घेवू शकत नाही.
तरी मी तो माल १५ रुपये किलोने दिला असून १३ टन दिला असून त्या मालाचे पैसे ही मला व्यापाऱ्याने दिले नाही, तरी १ लाख ९५ हजार रुपयेचा माल व्यापारी परत करतो म्हणत आहेत, तरी मी या नुकसानास कसे भरून काढणार आहे.
तसेच मी स्वता महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्राच्या मालकांना मो व्होनटो औषध मागितले असताना त्यांनी मला कडवट हे औषध मिलीबाग साठी दिले आहे. तरी त्यांनी नको म्हणत असताना त्याचा आसर १० ते १५ दिवसाचा असतो म्हणून मला
दिले व फवारणी करणेसाठी सांगितले, ते औषध फवारणी दि. ३/१२/२०२२ रोजी करून आजही द्राक्ष बागेतील द्राक्ष कडू लागतात. तरी माझ्या द्राक्ष बागे वरती• सोसायटीचे कर्ज ५ लाख २० हजार असून माझ्यावरती या कृषी सेवा केंद्राच्या मालकामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
मार्च मुळे सोसायटीचे पैसे कसे भरावयाचे व बागेला गेलेला खर्च हे सर्व नुकसान न भरून येण्यासारखे असल्यामुळे मी स्वता वा माझे कुटुबियांना औषध पिवून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. व आज बागेत आठ ते दहा टन माल असून तो माल कोणताही व्यापारी घेत नाही. तरी आपणाकडून लवकरात लवकर बागेचा पंचनामा करून श्री. महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र नेलकरंजी या कृषी सेवा केंद्राचा मालकावर गुन्हा दाखल करून चौकशी व्हावी,
अन्यथा मी येत्या आठ दिवसात आपल्या कृषी कार्यालया समोर माझे सह कुटुंब आत्महत्या करणार असून याची सर्व जबाबदारी प्रशासन व्यवस्थेची राहील. या अर्जाचा विचार करून पंचायत समिती आटपाडी कृषी विभाग याने दिनांक 14/03/2023 रोजी कृषी विभागाने त्या शेतकऱ्याला कंपनीला आणि कृषी दुकानदाराला पत्र काढले
द्राक्ष बागेचे औषध फवारणीमुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करणेबाबत.
मु.पो.घानंद ता. आटपाडी यांनी मे. महालक्षमी कृषि कल्याण नेलकरंजी या कृषि सेवा केंद्रातुन मे Solufine Agritech, Chankya Chowk Kupwad Tal.Miraj Dist. Sangli या कपंनीने उत्तपादित केलेले
कडवट नावाने औषध द्राक्ष बागेवर फवारल्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान झालेबाबत तक्रार अर्ज दिलेला आहे.
तरी सदर क्षेत्राची पहाणी व पुढील कार्यवाही करणेबाबत प्रक्षेत्र भेटीचा दिनांक १५.०३.२०२३ रोजी सकाळी११.३० वाजता निश्चित करणेत आलेला आहे.
तरी सदर भेटीसाठी आपण दि.१५.०३.२०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता श्री.हिंदुराव गणपत माने मु.पो.घानंद ता. आटपाडी यांचे गट नं. ४२१ घानंद ता. आटपाडी येथील द्राक्ष बागेत उपस्थित राहावे हि विनंती. तालुका कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणं
खालील प्रमाणे
दिनांक 13 3 2023 रोजी हिंदुराव गणपत माने मु. पो. घाणंद तालुका आटपाडी या शेतकऱ्याचा द्राक्ष बागेवर कडवट नावाचा औषध फवारल्यामुळे द्राक्ष मळ्यात नुकसान झालं द्राक्ष बागेचे नुकसान झालं आणि त्या मण्याची चव आहे ते कडवट चव आहे.
त्या कारणाने कोणताही व्यापारी माल घेत नाही आणि साधारणता 20 ते 25 टन द्राक्षाचे नुकसान झालेला आहे.
अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला त्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मा.उपविभागी कृषी अधिकारी तथा अध्यक्ष तालुका तक्रार निवारण समिती मा. तालुका कृषी अधिकारी आटपाडी प्रमुख शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर तालुका मिरज आणि मी स्वतः कृषी अधिकारी पंचायत समिती आटपाडी आमचे टीमने आज रोजी प्रत्यक्ष बागेची पाहणी केली
तर त्या ठिकाणी द्राक्ष मन्याची कडवट चव आढळून आलेले आहे संपूर्ण बागेचा पंचनामा केलेला आहे आणि पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना अहवाल दिला जाईल त्याच्यानुसार पुढील कारवाई चालू आहे


0 Comments