Breaking News

पुणे हादरले; आधी पत्नी आणि ८ वर्षाच्या मुलाला संपवलं, Software इंजिनियरचे टोकाचे पाऊल

 पुणे हादरले; आधी पत्नी आणि ८ वर्षाच्या मुलाला संपवलं, Software इंजिनियरचे टोकाचे पाऊल

पुणे शहराला हादरवणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औंधमध्ये एकाच कुटुंबातील तिघांनी आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

संगणक अभियंता असणाऱ्या सुदिप्तो गांगुली (वय ४४ ) यांनी पॉलिथिनची पिशवी तोंडाला गुंडाळून मुलगा आणि पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. 

भाऊ आणि वाहिनी फोन उचलत नाहीत तसेच संपर्क होत नसल्याने बंगलोरला राहणाऱ्या मृत सुदीपच्या भावाने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार केली होती.

भावाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास केला असता औंध येथील घरामध्ये तिन्ही मृतदेह आढळून आले. अधिकच तपास चतुःश्रृंगी पोलिसांकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments