google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील ४ अधिकारी स्वीकारणार सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार! सांगोला पोलीस स्टेशनहुन ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या व पहा सविस्तर माहिती

Breaking News

सांगोला तालुक्यातील ४ अधिकारी स्वीकारणार सांगोला पोलीस स्टेशनचा पदभार! सांगोला पोलीस स्टेशनहुन ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या व पहा सविस्तर माहिती

 सांगोला तालुक्यातील ४ अधिकारी स्वीकारणार सांगोला

पोलीस स्टेशनचा पदभार! सांगोला पोलीस स्टेशनहुन ४ अधिकाऱ्यांच्या बदल्या   व पहा सविस्तर माहिती 

सांगोला /प्रतिनिधी सांगोला पोलीस स्टेशन मधून चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन चार नवीन पोलीस अधिकारी सांगोला तालुक्यातील पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारणार आहेत.

उपरोक्त संदर्भ व विषयान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 22 न (1) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जनहितार्थ आणि प्रशासनिक निकडीनुसार, 

पोलीस अधिक्षक स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण आस्थापनेवरील खालील नमुद पोलीस अधिकारी यांच्या त्याच नावासमोर दर्शविलेल्या ठिकाणी नेमणुका करण्यात येत आहेत.

पंढरपूर तालुक्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ महादेव खरात यांची बदली सांगोला पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सुधाकर जगताप करमाळ्याहून सांगोला येथे बदली झाली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत तुकाराम हुले सांगोला हून टेंभुर्णीला बदली झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नागेश बाळू यमगर यांची सांगोल्याहून मोहोळला बदली झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिवाजी माने यांची पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये बदली झाली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक आशुतोष विवेक चव्हाण यांची मोहळहून  सांगोल्याला बदली झाली.पोलीस उपनिरीक्षक संदेश सावता नाळे यांची सांगोलाहून कुर्डूवाडी येथे बदली झाली. पोलीस उपनिरीक्षक पोपट विलास काशीद यांची टेंभुर्णी होऊन सांगोल्याला बदली झाली.

Post a Comment

0 Comments