सांगोला मा.आम.भाई गणपतरावजी देशमुख विचारमंच आयोजीत
रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा व कॉमेडी नाटकास उत्स्फुर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी):- जागतिक महिला दिनानिमित्त मा. आम. भाई गणपतरावजी देशमुख विचारमंच आयोजीत रांगोळी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा व कॉमेडी नाटकास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर डॉ. निकीताताई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
रांगोळी स्पर्धेमध्ये सौ. रेश्मा प्रशांत दिवटे यांनी प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक सौ. स्नेहल निलेश मडके यांनी तर तृतीय क्रमांक सौ. आरती शिवदास दिवटे यांनी पटकाविला.तर वेशभूषा स्पर्धेत लक्ष्मी शांतयास्वामी यांनी प्रथम क्रमांक, आश्विनी राजेंद्र मागाडे यांनी व्दितीय क्रमांक तर मनिषा जगताप यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
वेशभूषा स्पर्धेसाठी रेश्मा गुजर मॅडम (पंढरपूर), तनु थोरात मॅडम (सांगोला), बिना शर्मा मॅडम (सांगोला) यांनी तर रांगोळी स्पर्धेसाठी सौ. मैना चौरे मॅडम (पेनुर), श्री शिवभूषण ढोबळे सर (नाझरे),
सौ.हवेली मॅडम (सांगोला), पल्लवी थोरात मॅडम (सांगोला) यांनी परीक्षणाचे काम केले. सायंकाळच्या सुमारास कौटुंबिक असा पाच फुटाचा बच्चन हे कॉमेडी नाटक संपन्न झाले. यावेळी सांगोला शहरासह परिसरातील नागरिक, महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments