पंढरपूर दोन वेगवेगळ्या अपघातात दोन शाळकरी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू!करकंब पोलीस स्टेशन हद्दीत शोककळा
पंढरपूर तालुक्यातील गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या अपघातात अक्षरा देविदास जमदाडे रा.भोसे (वय 14) व राधा नागन्नाथ आवटे रा.बादलकोट (वय 16) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार,अक्षरा जमदाडे ही भोसे येथील यशवंत विद्यालयात इयत्ता 7 वी मध्ये शिकत होती.
ती गुरुवारी 11 वाजण्याच्या सुमारास आपली शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना भोसे पाटी येथे आल्यानंतर पीकअपचा दरवाजा उघडल्याने त्याचा धक्का बसून अक्षरा ही बाजूने जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायर खाली पडल्याने अक्षराचा मृत्यु झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.त्यामुळे भोसे परिसरावर शोककळा पसरली आहे.
तर दुसऱ्या घटनेत पेहे माध्यमिक
विद्यालयात शिकत असलेली राधा आवटे ही इयत्ता दहावीचा पेपर संपल्यानंतर आपला भाऊ संदीप याच्या सोबत मोटारसायकल वरून ढेकळेवाडीला नातेवाईकांकडे जात असताना बार्डी रोड वरील एम ई सि बी कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या बाजूचे पेटलेले झाड
अचानक अंगावर पडून त्यामध्ये राधा हिच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने करकंब ग्रामीण रुग्णालयात उपचारापूर्वीच मयत झाली.पेहे,बादलकोट परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोना मयूर गव्हाणे व अभिजित कांबळे करीत आहेत.
चौकट
पालकांनी लहान मुलांना मोटार सायकली देऊ नयेत :
पाचवी ते दहावी पर्यंतचे वाडी वस्ती किंवा जवळच्या गावातून येणारे जवळपास सर्वच विद्यार्थी दोन-दोन तीन-तीन जण बसून भरघाव वेगात मोटार सायकलवरून शाळेला येताना दिसत आहेत. अनेकवेळा शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही सूचना दिल्या आहेत परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे.


0 Comments