कसबापेठ पोट निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर प्रचंड बहुमताने विजयी
सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा
भाजपच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा धुमाकूळ
सांगोला/ कसबापेठ पोट निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर प्रचंड बहुमताने विजयी झाले. सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुष्पहार फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या कसबा पेठ पोट निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला आहे. कसबा पेठ पोटनिवडणूक जिंकून महाविकास आघाडीने भाजपला मोठा धक्का दिला आहे.
त्याबद्दल महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचा आनंदोत्सव सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगोला शहरातील नेहरू चौक येथील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. यावेळी तालुकाध्यक्ष सुनील भोरे, संजय निराधार समितीचे मा. सदस्य विलास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील,
ओबीसी तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर काळे, शहराध्यक्ष फिरोज मनेरी, युवक शहराध्यक्ष काशिनाथ ढोले, युवक तालुकाध्यक्ष अजित चव्हाण, प्रशांत रायचुरे, प्रसाद खडतरे, नूर मनेरी, कोळेकर, तसेच सांगोला तालुका काँग्रेस आहे कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
पुरोगामी विचाराला मारण्याचे पाप करणाऱ्या भाजपला कसबा पेठेतील जनतेने धडा शिकवला आहे. भाजपच्या सत्ता, पैसा व दहशतीला कसब्याच्या जनतेने चोख उत्तर दिले आहे.
कसबा पेठ या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. गेली 28 वर्षे या मतदारसंघातून भाजपा उमेदवार निवडून येत असे. पण यावेळी कसबा पेठच्या जनतेने भाजपचा डाव उधळून लावला.
पुणे हे शाहू, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी विचारांचे शहर असून, माजी राज्यपाल व भाजपने सातत्याने या विचाराचा अपमान करण्याचे पाप केले आहे. जनतेला हे आवडले नाही. म्हणून जनतेने मत पेटीतून भाजपला जागा दाखवून दिली आहे.
सुनील भोरे
तालुकाध्यक्ष काँग्रेस (आय) कमिटी


0 Comments