माईंडफुलनेस या एक दिवसाच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद
मुंबईहून आकाशवाणी निवेदक मा. उमेश घळसासी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित
सांगोला प्रतिनिधी/समाधान मोरे
आनंदी भरीन तिने लोक ही प्रतिज्ञा घेऊन कार्य करीत असलेल्या माझ्या परिघात सेवा समूहाच्या वतीने आयोजित केलेल्या माईंडफुलनेस या एक दिवसाच्या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला.
यासाठी मुंबईहून आकाशवाणी निवेदक मा. उमेश घळसासी हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सदर कार्यशाळा शिक्षक सोसायटीच्या सभागृहामध्ये सांगोला येथे मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत पार पडली.
यावेळी प्रतिकूल परिस्थितीत देखील मानसिक शांती कायम ठेवून सक्रिय राहणे.
राग,भीती,चिंता योग्य वेळी योग्य प्रकारे व्यक्त करण्याची क्षमता प्राप्त करणे, सह अनुभूती विकसित करून नाते संबंध दृढ करणे, स्वतःला आणि इतरांना प्रेरित करणे, आनंदी वातावरण निर्माण करणे, मानसिक तणाव योग्य पातळीवर ठेवून
आयुष्याला अर्थ प्राप्त करून घेणे, नकारात्मक भावना आणि भीतीदायक विचार यांचा त्रास कमी करणे, मनाची चंचलता कमी करणे, स्मृती विकसित करणे इत्यादी विषयांचे तंत्र विवेचन,प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरांचा समावेश होता.
याप्रसंगी .आयुब पटेल, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी,श्री.रणजित जगताप,श्री.बसवेश्वर झाडबुके,श्री.योगेश कांबळे, श्री.निसार तांबोळी(पत्रकार), दादासाहेब केदार, श्री. एस. के. पाटील डॉ. गौरव माने, श्री. तानाजी आळतेकर श्री.शरद इंगवले, श्री. राजू राऊत, सौ.उषा गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.
अमोल गायकवाड,भारत मेटकरी, संजय गव्हाणे, संतोष नरळे, सतीश येलपले, अतुल उकळे, आण्णासो गायकवाड,
अतुल वाघमोडे,अविनाश कुलकर्णी,दयानंद बनकर,सुभाष भंडगे यांचे सहकार्य लाभले.


0 Comments