सांगोल्यात वृक्ष लागवडीचा बोजवारा शिवणेच्या जंगलातील झाडे पाण्याअभावी जळू लागली; वनखात्याचे दुर्लक्ष
सांगोला तालुक्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचा पुरता बोजवारा उडाला आहे. वन अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याअभावी वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील वृक्ष जळून गेले आहेत.
त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेल्याने संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाणार, याकडे निसर्गप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले आहे.वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आखला होता.
त्यानुसार तालुक्यातील वन विभागाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळ्याजातींच्या वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित वन अधिकारी-कर्मचाऱ्यांकडेहोती. सांगोला तालुक्यात वन विभागाच्या हजारो हेक्टर क्षेत्रावर ३३ कोटी वृक्ष लागवडीची संकल्पन राबवली आहे.
लागवडीनंतर वृक्ष उगवले, परंतु वन विभागाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाण्याअभावी झाडे जळून गेली आहेत. एकीकडे शासनाचा हजारो लाखो रुपये टँकरच्या पाण्यावर खर्च दाखविला जातोय, मात्र दुसरीकडे टँकरचे पाणी प्रत्यक्ष झाडांना मिळतच नाही.
मग नेमके पाणी कुठे मुरतंय,असा प्रश्न निसर्गप्रेमी नागरिकांना पडला आहे. शिवणे (ता. सांगोला) येथील फॉरेस्ट ग.नं. ६१८ मध्ये १० हेक्टर क्षेत्रावर ११११० वृक्षांची लागवड २०१९ मध्ये करण्यात आली आहे. मात्र सध्या येथील वृक्ष पाण्याअभावी जळू लागले आहेत. वन विभागाने पाण्याची व्यवस्था करुन वृक्षांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
चौकशी करून कारवाई करावी : पाटील
सांगोला तालुक्यात वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील जळालेल्या वृक्षांबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केली आहे.


0 Comments