google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आनंदाची बातमी..केदार हॉस्पिटल सांगोला येथे सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिराचे आयोजन

Breaking News

आनंदाची बातमी..केदार हॉस्पिटल सांगोला येथे सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिराचे आयोजन

 आनंदाची बातमी..केदार हॉस्पिटल सांगोला येथे सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिराचे आयोजन

सांगोला शहरातील वासुद रोड येथील केदार हॉस्पिटलमध्ये सुवर्णबिंदू प्राशन संस्कार शिबिराचे म्हणजेच लहान मुलांना सुदृढ बलशाली बनवणाऱ्या आयुर्वेदिक उपचार पद्धती शिबिराचे आयोजन गुरुवार व शुक्रवार दिनांक 30 व 31 मार्च रोजी केले आहे. 

कोणत्या वयोगटांमध्ये सुवर्णबिंदू प्राशन दिले तर चालते जन्मापासून ते 12 वर्ष वयोगटातील नवजात शिशू व सर्व मुला मुलींना याचा फायदा होतो.

सुवर्णबिंदू मध्ये शुद्ध, सुवर्ण, ब्राही, शंखपुष्पी, पिंपळी, मंडूकपर्णी, अश्वगंधा, शुद्ध, ब्राही घृत, शुद्ध मध या औषधी वनस्पतींचा व घटकांचा समावेश होतो. सुवर्णप्राशन कशासाठी द्यावे त्याचे फायदे काय बालकांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकासासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे सुवर्णबिंदू प्राशन आहे.

 त्याचे फायदे सांगायचे झाले तर सुवर्ण प्राशनाने ग्रहणशक्ती, एकाग्रता, बुद्धी, स्मृति, मेधा वाढते. तसेच बालकांचे वारंवार आजारी पडणे कमी होते बालकांची वर्ण, उंची, पचनशक्ती सुधारते व जिवाणू विषाणूजन्य आजारांची वारंवार होणारे संक्रमण थांबण्यास मदत होते. 

या सर्व फायद्यासाठी व आपल्या मुलाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी सुवर्ण बिंदू प्राशन शिबिराचा लाभ केदार हॉस्पिटल सांगोला पॉलिक्लिनिक वाटंबरे येथे घ्यावा असे आव्हान हॉस्पिटलचे डॉ निरंजन केदार यांनी केले आहे.

 सुवर्णबिंदू प्राशनाने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत सुवर्णबिंदू प्राशन तीन महिने सहा पॅकेज स्वरूपात उपलब्ध आहे. सुवर्णबिंदू प्राशन शिबिरासाठी संपर्क 8010551108, 7972481094

Post a Comment

0 Comments