google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकून भोसकून हत्या

Breaking News

खळबळजनक घटना...आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकून भोसकून हत्या

खळबळजनक घटना...आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकून भोसकून हत्या

 आईनेच ४ वर्षीय चिमुरडीला संपवलं; खळबळजनक घटना

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार आणि दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे हे घडत असतात.

 त्याचदरम्यान, एक संतापजनक घटना शहरातील हडपसर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकून भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घटना काल सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हडपसर येथील सिद्विविनायक दुर्वांकूर सोसायटी ससाणे नगर येथे घडली आहे. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी आईला अटक केली आहे. 

दरम्यान, आरोपी आईने ही हत्या कोण्यात कारणातून केली हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वैष्णवी महेश वाडेर ( वय ४ वर्ष) असं हत्या झालेल्या या प्रकरणी तिची आई आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी महिला ही तिच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. 

महिन्यापूर्वी ती तेथे राहण्यास आली होती. बेकरी प्रॉडक्ट विक्रीचा व्यवसाय आरोपी महिला करत होती. सोमवारी ती भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक तेथे गेले होते. त्यावेळी तिने दरवाजा आतून बंद करून घेतला होता.

शेजारच्यांनी महिलेला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, तिने दरावाजा उघडला नाही. शेवटी घरमालक आणि शेजाऱ्यांनी आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह दिसून आला.

 त्यांनी तात्काळ याची पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Post a Comment

0 Comments