google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला ता. शिवणे येथे मजूर, कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ

Breaking News

सांगोला ता. शिवणे येथे मजूर, कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ

सांगोला ता. शिवणे येथे मजूर, कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ

सांगोला (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)  तालुक्यातील शिवणे ग्रामपंचायतीच्या वतीने बांधकाम कामगार आणि मजुरांसाठी सुरू


असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ नुकताच शिवणे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला.

सहाय्यक कामगार आयुक्त (बांधकाम) सोलापूर तसेच इतर कामगारांच्या वतीने कामगार,मजूर, गोरगरीब आणि अनाथ निराधार लोकांसाठी मध्यान्ह भोजन आहाराचे मोफत वाटप करण्यात येते. 

सदर मजूर, कामगारांसाठी सुरू असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ यांच्या पुढाकाराने शिवणे येथे बुधवार दिनांक 29 मार्च रोजी करण्यात आला. पहिल्याच दिवशी गावातील 200 लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला. 

सदरची योजना गोरगरीबांसाठी असून गावातील गोरगरीब लाभार्थ्यांनी मध्यान्ह भोजन योजनेचा नियमित लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच दादासाहेब घाडगे यांनी केले आहे ‌. 

मध्यान्ह भोजन योजनेत लाभ घेतलेल्या ग्रामपंचायतीना दररोज सकाळी योजनेचा आहार पोहोच केला जाणार आहे.

आठवड्यातून एक दिवस आहाराला सुट्टी राहिल. याप्रसंगी उपसरपंच उदयसिंह घाडगे, जेष्ठ नेते विलास भाऊ घाडगे, माजी सरपंच गणपत माळी,ग्रामसेवक,डी.आर.लंगोटे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, लाभार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments