सोलापूर - बार्शी पोलीसांनी आवळल्या मुसक्या"बापरे !
फायनान्स कंपनीचा अधिकारीच निघाला मोठा चोर, तब्बल २५ गाड्या स्क्रॅप म्हणुन विकल्या
"बार्शीत मागील काही दिवसामध्ये मोटारसायकल चोरी करणारा संशयित सत्यवान रामहरी भोसले ( सिरसट ) ( रा. पडसाळी)यास जेरबंद करण्यात आले आहे.
पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याने बार्शी शहर, टेभुर्णी, सोलापूर तालुका, पंढरपुर शहर, सोलापूर शहर, नळदुर्ग उस्मानाबाद येथुन मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे
त्याची चौकशी केली असता त्याने फायनान्सकंपनीमध्ये रिकव्हरी अधिकारी असून त्याचेकडे स्क्रॅपचा विभाग आहे.
स्क्रॅप मधील गाडी विक्री करीत असताना तो सदरची गाडी ही स्क्रॅपची असल्याने तिला कागदपत्रे नाहीत परंतु तुम्हाला फायनान्सचे पत्र देतो असे सांगून तो गाडीची विक्री करीत होता.
तसेच तो त्याच्या व्हॉट्सअपस्टेटसवर फायनान्सचे स्क्रॅप मधील मोटारसायकल विकणे असलेबाबत स्टेटस ठेवत होता. आरोपीकडून २५ मोटारसायकल किंमत ८,७५,०००/- रु.चा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहा. पोलीस निरीक्षक सुधीरतोरडमल, सहा. पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोहेकॉ शैलेश चौगुले, पोना मनिष पवार,
पोना अमोल माने, पोना वैभव ठेंगल, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अंकुश जाधव पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ अविनाश पवार, पोकॉ रवी लगदिवे, रतन जाधव सायबर पोलीसठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.


0 Comments