google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे एकत्र..! विधानभवनामध्ये नेमके काय घडले?

Breaking News

देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे एकत्र..! विधानभवनामध्ये नेमके काय घडले?

 देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरे एकत्र..! विधानभवनामध्ये नेमके काय घडले? 

 राज्याच्या राजकारणात शिंदे गटाची स्थापना झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील अंतर अधिकच वाढत गेले आहे. 

एवढेच नाहीतर शिंदे गटाला पुढे करुनच भाजप आपला राजकीय उद्देश साध्य करीत असल्याचे बोलले जात आहे. सध्या राजकीय वातावरण तापले असतानाच अचानक उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आल्याचे वाचून तुम्हाला धक्का बसेल पण, हे झाले आहे.

 सध्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे विधीमंडळाच्या पायऱ्यांजवळ एकत्र आले होते. 

एवढेच नाही तर त्या दोघांनी विधान भवन परिसरात संवादही साधला आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आपले संबंध हे वैयक्तिक पातळीवर हे सूत्र या दोन्ही नेत्यांनी पाळले असल्याचे दिसून आले.

सत्तासंघर्षांतरची पहिलीच भेट

शिवसेना आणि शिंदे गटातील मतभेदानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे ना एका मंचावर आले ना त्यांच्यामध्ये कोणती बैठक पार पडलेली आहे. गेल्या आठ महिन्याच्या काळानंतर ते आज समोरासमोर आले ते, विधान सभा मंडळ परिसरात. 

अनपेक्षितपणे विधान भवनाच्या पायऱ्याजवळच यांची भेट झाली. तर नमस्कार करीत दोघांमध्ये गप्पाही सुरु झाल्या होत्या. त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी आणि इतर वेळी समाजकारणावर भर असल्याचे समोर आले आहे.

उपस्थितांच्या उंचावल्या भुवया

विधीमंडळात आज मराठी भाषेसंदर्भात कार्यक्रम होणार आहे. त्याअुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकाच वेळी पायऱ्यांजवळ आले होते. 

त्या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नव्हता. तर चेहऱ्यावर हास्य होते. त्यांच्या दोघांमधील संवाद पाहून यावेळी आमदार रवींद्र वायकर, मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. या दोन नेत्यांमध्ये संवाद पाहून उपस्थितांनाही आश्चर्य़ वाटले.

Post a Comment

0 Comments