google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज ! सोलापूर नजीक मोठा अपघात तीन तरुण जागीच ठार..

Breaking News

ब्रेकिंग न्यूज ! सोलापूर नजीक मोठा अपघात तीन तरुण जागीच ठार..

 ब्रेकिंग न्यूज ! सोलापूर नजीक मोठा  अपघात तीन तरुण जागीच ठार.. 

सोलापूर शहर व परिसरात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आज सोलापूर शहरा नजीक मोठा अपघात झाला आहे. 

तुळजापुरातील तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला जाताना बोलेरो गाडीचे टायर फुटून झालेल्या अपघातात तीन तरुण जागीच ठार झाले. याशिवाय या अपघातात पाच तरुण गंभीरित्या जखमी झाले आहेत. 

हा भीषण अपघात आज सकाळी सात वाजल्याच्या दरम्यान घडला आहे. या अपघातात मरण पावलेले तरुण व जखमी झालेले तरुण हे नाशिक जिल्ह्यातील आहेत. 

या अपघातात निखिल रामदास सानप वय 21, अनिकेत बाळासाहेब भाबड वय 21, अथर्व शशिकांत खैरनार वय 21 (सर्व राहणार चास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक) हे तरुण जागीच ठार झाले. या अपघातात पाच जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमी असलेले तरुण देखील नाशिक जिल्ह्यातीलच आहेत.

Post a Comment

0 Comments