पंढरपूर तालुक्यात धक्कादायक घटना अपहरण करून खून करण्याचा प्रयत्न, सात जणांना अटक ! पंढरपूर
एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यात घडली असून या घटनेने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील एका वीस वर्षीय तरुणाला जबरदस्तीने गाडीत कोंबून त्याला तालुक्याच्या बाहेर नेण्यात आले आणि त्याला जबर मारहाण करण्यात आल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
त्यानुसार पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील किरण सर्जेराव लोखंडे या तरुणाचे काही जणांनी अपहरण केले आणि पुढील थरारक घटना घडली. एका महिलेशी संबंध असल्याच्या आणि तिच्याशी फोनवरून बोलत असल्याच्या संशयावरून ही मोठी घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे या घटनेत एकूण सात आरोपी असून ते वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत. किरण लोखंडे याचे अपहरण करून त्याला दुसऱ्या तालुक्यात नेण्यात आले आणि तेथे त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे.
महिलेशी असलेल्या कथित संबंधाचा आणि तिच्याशी फोनवरून बोलत असल्याचा संशय असल्याचे किरण लोखंडे याच्या अपहरणाचा डाव आखण्यात आला. आरोपींनी संगनमत करून किरण याला रोपळे चौकात बोलावून घेतले.
तेथून माळशिरस तालुक्यातील चैतन्य दत्तात्रय पाटील याच्या स्कर्पिओ गाडीत जबरदस्तीने घालण्यात आले. ही गाडी बाभूळगाव, पंढरपूर तालुक्यातील भाळवणी या मार्गाने माळशिरस तालुक्यातील साळमुख चौक, पिलीव या दिशेने नेण्यात आली.
जाताना किरण याला ठीकठिकाणी लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण सुरूच ठेवली होती. पिलीवच्या जवळ गेल्यानंतर त्याला एका कालव्याच्या जवळ नेण्यात आले आणि ठेथेही त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला आहे.
सदर सर्व घटनेबाबत किरण याने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाच
पण सातही आरोपींना पोलिसांनी तातडीने आणि कौशल्याने अटक देखील केली आहे. यात चैतन्य दत्तात्रय पाटील ( खंडाळी, ता. माळशिरस), हर्षवर्धन दादासो मगर (गारवाड, ता. माळशिरस), आकाश बाळू मुळे (खंडाळी, ता. मोहोळ),
महादेव साहेबराव भोसले ( पापरी, ता. मोहोळ), रोहीत नामदेव कांबळे (आष्टी, ता. मोहोळ), राजू चंद्रशेखर भंडारे (इंदिरानगर, सोलापूर) व योगेश किसन ढोले (रांजणगांव, ता. शिरूर) यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रोपळे परिसरात आणि पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.


0 Comments