google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अर्थसंकल्पीय अधिवेशनात गौतमी पाटीलचा मुद्दा गाजला, जाणून घ्या नेमकं काय झालं ?

Breaking News

अर्थसंकल्पीय अधिवेशनात गौतमी पाटीलचा मुद्दा गाजला, जाणून घ्या नेमकं काय झालं ?

 अर्थसंकल्पीय अधिवेशनात गौतमी पाटीलचा मुद्दा गाजला, जाणून घ्या नेमकं काय झालं ?

प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील सध्या बरीच चर्चेत आहे. आज उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. दरम्यान याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानपरिषदेमध्ये गौतमी पाटील  हिचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

 भाजप आमदार उमा खापरे यांनी गौतमी पाटील मुद्दा विधानपरिषदेत नाव न घेता उपस्थित केला. राज्यात लावणीच्या नावाखाली अश्लील प्रकार सूरू आहेत. असे प्रकार बंद व्हावेत यासाठी तात्काळ राज्यात लावण्यांच्या कार्यक्रमावर सेन्सॉर लावण्याची गरज आहे, अशी मागणी उमा खापरे यांनी केली. 

उमा खापरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी म्हटलं की, "राज्यांत अशी समिती आधीपासून उपलब्ध आहे. मात्र या समितीकडे या विषयावर काही अर्ज येत नाहीत.."

 लावणी डान्सर गौतमी पाटील  यांच्या शो आणि घेतलल्या आक्षेपावर बोलण्याची माझी इच्छा आहे. मला यावर बोलण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनिषा कायंदे  यांनी केली. 

मात्र गौतमी पाटील हा विषय सर्वांनाच माहित आहे असं म्हणत विधानपरिषद उपसभापतीपदी निलम गोऱ्हे  यांनी कायंदे यांना बोलण्यासाठी नकार दिला.

Post a Comment

0 Comments