Breaking News

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा

– केंद्राप्रमाणे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान निधी, शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये भरणार

– महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा

– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये, महामंडळामार्फत 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध

– छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये

– 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0

– मुलींसाठी लेक लाडकी योजना, जन्मानंतर मुलीला 5000 रुपये, – पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये, अकरावीत 8000 रुपये, मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये

– आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये

– महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत, आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार

– संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये

– ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

– महिलांना एसटी प्रवासात, सरसकट 50 टक्के सूट

– यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम, इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’

– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता

– आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी रुपये

– मुंबईच्या सुशोभिकरणासाठी 1729 कोटी रुपये

– विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ, पाचवी ते सातवच्या विद्यार्थ्यांना 1000 वरुन 5000 रुपये तर आठवी ते दहावीच्या 1500 वरुन 7500 रुपये, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत

– शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ

– विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान

– राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे

– नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब

– खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध, बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार

Post a Comment

0 Comments