google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्नीचे अनैतिक संबंध होते;पतीने माफ करत,असे पुन्हा करू नको सांगितले होते; तरीही प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली

Breaking News

पत्नीचे अनैतिक संबंध होते;पतीने माफ करत,असे पुन्हा करू नको सांगितले होते; तरीही प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली

 पत्नीचे अनैतिक संबंध होते;पतीने माफ करत,असे पुन्हा करू नको सांगितले होते;

तरीही प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली

कविता हिचा पती कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर रोजगाराच्या शोधात तामिळनाडू येथे गेला होता.त्यावेळी कविता हिला सासरी सोडले होते.शेजारी राहणाऱ्या संदिप राठोड सोबत कविताचे प्रेमसंबंध जुळले होते. 

 गेल्या दोन वर्षांपासून कविता कल्याणम हिचे  संदीप राठोड  प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र सदरची बाब कविता कल्याणम हिच्या पतीला कळल्यानंतर पतीने आपल्या पत्नीला समज देत अशी घटना पुन्हा होऊ नये अशी ताकीद दिली होती.कविताच्या आईने देखील समज दिली होती.

 त्यानंतर दोघातील प्रेम प्रकरण संपुष्टात आले होते. कविता याने,सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात राहावयास आली होती. मात्र प्रियकर संदीप राठोड हा मयत कविता कल्याणम हिची पाठ सोडत नव्हता.

शेवटी कविताने जीवनयात्राच संपवली आहे.कविताला 11 वर्षाचा मुलगा देखील आहे,आईविना तो पोरका झाल्याने कविताच्या आजूबाजूचे नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

एमआयडीसी पोलिसांनी तपास करत,प्रियकरविरोधात गुन्हा दाखल केला-

संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत होता. याच त्रासाला कंटाळून कविता कल्याणम हिने टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरातमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. 

अशी माहिती कविता कल्याणम यांच्या नातेवाईकांनी व शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली होती.एमआयडीसी पोलीसानी खोलात जाऊन तपास करत गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करावी अशी मागणी देखील केली आहे.

Post a Comment

0 Comments