google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार...

Breaking News

सांगोला तालुक्यातील बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार...

सांगोला तालुक्यातील बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार...

सांगोला हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक क मंडळाची निवडणूक जाहीर झाल्याने तालुक्यात पुन्हा एकदा शेकाप, शिवसेना, - राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

व बाजार समितीची निवडणूक शेकाप स्वबळावर न लढणार असल्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा शेकाप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी काट्याची टक्कर रंगणार आहे. दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, 

भाजपचे ने तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनीबाजार समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार आहे. शेतकरी सहकारी सूत गिरणी आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले.

 दरम्यान या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने दोन्ही संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचीनिवडणुक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केल्याने

 सत्ता कायम राखण्यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख यांना राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत संधी मिळावी म्हणून इच्छुक आपापल्या गॉडफादरकडे फिल्डिंग लावताना दिसत आहेत. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यासमवेत विचार विनिमय करण्यासाठी शिवसेना, 

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप,काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत बाजार समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार आहे. 

शेतकरी सहकारी सूत गिरणी आणि खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाल्याने शेकापचा आत्मविश्वास वाढला असल्याने त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याचे जाहीर केले. 

त्यामुळे बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शेकापविरुद्धशिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या ताकदीने सक्रीय झाल्याने बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

0 Comments