google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीसांची जुगार अड्डयावर छापा असा १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

Breaking News

सांगोला पोलीसांची जुगार अड्डयावर छापा असा १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

सांगोला पोलीसांची जुगार अड्डयावर छापा असा १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त रोख रकमेसह जुगार साहित्य जप्त

सांगोला :- जुगार अड्डयावर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगार साहित्य असा १ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून विश्वास आगतराव बाबर, अंकुश बाबू गायकवाड, बापुसाहेब ज्ञानु पाटील,

 दत्ता शिवाजी नवघरे, संजय आबा कांबळे सर्वजण रा. आलेगाव ता. सांगोला, शिवाजी रामचंद्र साळुंखे, सोमनाथ रमेश आंबेकर, दत्तात्रय शिवाजी मोरे सर्व रा. शिरभावी, ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या आदेशानुसारस. पो. नि. माने, पो. ना. भोसले, पो. ना. नलवडे, पो.ना. बंगाळे, पो. हे. कॉ. घोडसे, पो. ना. भोसले, पो.ना. जाधव, पो. कॉ. रविद्र साबळे असे पेट्रोलिंग करीत असताना आलेगाव येथे चिलारीत काही इसम पत्ते खेळत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

 त्या आधारे पोलिसांनी छापा टाकून छापा टाकून शिवाजी रामचंद्र साळुंखे, सोमनाथ रमेश आंबेकर, दत्तात्रय शिवाजी मोरे सर्व रा. शिरभावी, ता. सांगोला यांना ताब्यात घेऊन

 त्यांच्याकडून रोख रकमेसह जुगार साहित्य असा १ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी विश्वास आगतराव बाबर, अंकुश विश्वास आगतरावबाबर, अंकुश बाबू गायकवाड, बापुसाहेब ज्ञानु पाटील, दत्ता शिवाजी नवघरे, 

संजय आबा कांबळे रा. आलेगाव ता. सांगोला यांना ताब्यात घेत या कारवाईत पोलिसांनी रोख रकमेसह जुगार साहित्य असा ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत शिरभावी ते उंबरगावं रोडवर पिंपळीच्या झाडाखाली काही इसम जुगार खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

 त्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी बाबू गायकवाड, बापुसाहेब ज्ञानु पाटील, दत्ता शिवाजी नवघरे, संजय आबा कांबळे सर्वजण रा. आलेगाव ता. सांगोला, शिवाजी रामचंद्र साळुंखे, सोमनाथ रमेश आंबेकर, दत्तात्रय शिवाजी मोरेसर्व रा. शिरभावी, ता. सांगोला यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments