महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात फाशी घेऊन आत्महत्या!, सदर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ
महिलेची जिल्हा सामान्य रुग्णालयात फाशी घेऊन आत्महत्या!,
सदर घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नवजात शिशु अति दक्षता विभागातील प्रसाधन गृहात महिलेची आत्महत्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दुर्लक्ष!
मुलगा होत नाही सासर कडी मंडळी देत होते त्रास. सासर कडील मंडळीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या ! जिल्हा सामान्य रुग्णालय मधील वार्ड क्रमांक 23 मधील महिला प्रसाधन गृहात एका महिलेने फाशी घेतल्याची घटना घडली,
या घटने ने रुग्णालय परिसरात एकच धावपळ उडाली आहे, जिल्हा सामान्य रुग्णालय मधील वार्ड क्रमांक 23 मध्ये नवजात शिशु अति दक्षता विभाग आहे, या ठिकाणी असलेल्या महिला प्रसाधन गृहात एका 25 वर्ष वयोगटाच्या महिकेने प्रसाधन गृहात गळफास लावला,
आज सकाळी प्रसाधन गृहाची सफसफाई करण्या करता महिला सफाई कर्मचारी आली असता त्यांना प्रसाधन गृहाची दरवाजा आत मधून बंद असल्याचे दिसून आले, खूप वेळ दरवाजा ठोकला असता दरवाज न उघटल्याने इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता
त्या मध्ये सदर महिलेने गळफास घेतल्याचे दिसून आले, सदर महिलेने लोखंडी खिडकीच्या ओळणी बांधून गळफास घेतल्याचे समजते, गळफास घेतलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव गोदावरी राजेश खिलारे आहे ती राहणार पंचशील नगर वाशीम येथील असल्याचे समजते,
सदर महिला 2 मार्च राजी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती तिने एका मुलीला जन्म दिला होता, तिच्या सासरचे तिला मुलगी झाल्याने नाराजी होती, सदर महिला ही 15 तारखे पासून रुग्णालय वार्ड मधून न दिसून आल्याने तिच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग ची तक्रार दाखल केली होती.
रुग्णालयातील सफाई कर्मचारी आज संपावरून परतल्यानंतर रुग्णालय मधील स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याकरिता गेले असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. मृतक महिलेच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार तीच्या तिला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरच्यान कडून सदर महिलेला मानसिक त्रास दिला जात होता
त्यामुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलण्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. सदर प्रकरणांमध्ये दोषी असणाऱ्यांवर पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी तिचे नातेवाईकांनी केली आहे. मृतक महिलेच्या भावाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील नवजात शिशु अति दक्षता विभाग महिलेची आत्महत्या! ची घटना घडली असून जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कारभार सर्व सामान्य नागरिकांना माहितीच आहे. याकडे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही.
गेल्या दोन दिवसापासून सदर महिलेने प्रसाधन गृहात आत्महत्या केली. याकडे जिल्हा सामान्य रुग्णालय लक्ष नव्हते का? संप असला तरी जिल्हा सामान्य रुग्णालयाने इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नव्हती का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात वारंवार सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम जिल्हा सामान्य रुग्णालयतर नेहमीच केल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाले आहेत. त्यात साफसफाई विषयी सामान्य नागरिकांची तक्रार नेहमीच केल्या जातात.
मात्र कुंभकर्णी झोपेत असलेले जिल्हा सामान्य रुग्णालय येथील वरिष्ठांना काही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे चित्र आज दिसून आले. सदर महिला रुग्णालयात असताना ती अचानक गायब कशी झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे याकडे लक्ष नव्हते का. सदर प्रसाधन गृहात रुग्णालयाचे सुपरवायझर लक्ष देत नसतात का?आता असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


0 Comments