सांगोला शहरास अतिक्रमणाचा विळखा प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
सांगोला : शहरामध्ये सध्या अतिक्रमणे चौकाचौकांत झालेली आहेत. रस्त्यालगत शासकीय कार्यालयालगत, पेट्रोल पंपालगत पान टपऱ्या, चहाचे गाडे,
रसवंतीगृह, हॉटेल, भेळ व्यवसाय, चप्पल विक्रीपासून ते अनेक प्रकारचे उद्योग- व्यवसाय, जुगार - मटक्याचे अड्डे आदी अतिक्रमणामुळे सर्वसामान्य लोकांना, वाहनचालकांना त्रास होत आहे. ही अतिक्रमणे तत्काळ काढून घ्यावीत,अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चौकातील रस्त्यातील पुतळ्यांच्या बँकाच्या शेजारील अतिक्रमणामुळे रस्त्यावरून ये-जा करणेसुद्धा कठीण झाले आहे.
ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या माणसांना मोटारसायकली, चारचाकी वाहने रस्त्यावर लावण्याची वेळ येत आहे. त्यात जास्तीत जास्त अतिक्रमणे येणारे चौक- नाके यामध्ये तहसील कार्यालय, अहिल्या चौक, वंदे मातरम चौक, कडलास नाका,
वासुद चौक, बस स्टैंड, कचेरी रोड, पंढरपूर रोड, एखतपूर रोड, पंचायत समितीसमोर, महूद रोड, वाढेगाव नाका स्मशान भूमी, शिवाजी चौक, नेहरू चौक, फुले चौक, जुनी भाजी मंडई, नगर परिषदेसमोर, स्टेशन रोड, जय भवानी चौक, जि. प. बांधकाम विभाग, धनगर गल्ली, अहिल्यादेवी पुतळ्यासमोर,
अण्णा भाऊ साठे पुतळयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक आदी ठिकाणी किरकोळ व्यवसाय करणाऱ्या सर्व लोकांनी केलेली अतिक्रमणे काढण्यात यावीत, जेणेकरून बाजारपेठेत शहरात येणाऱ्या लोकांना गाड्या लावण्यास, खरेदी करण्यास अडथळा होणार नाही.
या सर्व अतिक्रमणधारकांवर योग्य कारवाई व्हावी व अतिक्रमणे हटविण्याबाबतची नागरिकांकडून लेखी तक्रार देण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला


0 Comments