Breaking News

सांगोला नगरपालिकेच्या 'स्वच्छतेचे वाजले तीन तेरा आणि नगरपालिका म्हणतेय आधी कर भरा'

 सांगोला नगरपालिकेच्या 'स्वच्छतेचे वाजले तीन तेरा आणि नगरपालिका म्हणतेय आधी कर भरा'


सांगोला : एकीकडे जुनी पेन्शन मिळावी यासंदर्भात नगरपालिका आरोग्य विभागातील कर्मचारी संपावर आहेत. दुसरीकडे मार्चअखेरची वसुली जोमात सुरू आहे. परंतु स्वच्छतेकडे लक्ष देण्यासाठी पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ नाही.

 परिणामी स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठिकठिकाणी कचरा साचून आहे. यामुळे 'स्वच्छतेचे वाजले तीन तेरा आणि नगरपालिका म्हणत आहे आधी कर भरा', अशी परिस्थिती सांगोला शहरात निर्माण झाली आहे.

सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जुनी भाजी मंडई परिसरात सांगोला नगरपालिकेच्या मालकीचे गाळे आहेत. या गाळ्यांच्या खालून गाव ओढा वाहात आहे. या ओढ्याच्या खालील परिसरामध्ये कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत व्यापाऱ्यांमधून स्वच्छतेची मागणी होत आहे.

 मागील तीन ते चार दिवसांपासून कचरा उचलून याठिकाणी साफसफाई मोहीम राबवली नाही. परिसरामध्ये साचून राहिलेला कचरा आणि त्याखालून जाणारे पाणी यामुळेपरिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.

 दिवसभर उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी थंड हवा यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. यामध्ये भरीसभर म्हणून येथील व्यापाऱ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणीचा आरोग्याचा प्रश्न जरी प्रामुख्याने ऐरणीवर असला तरी, 

आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी हे पूर्वीप्रमाणे पेन्शन मिळावी या मागणीसाठी आंदोलनात आहेत. सध्या आंदोलन जोमात सुरू असले तरी काही कर्मचारी हे मार्चअखेरच्या वसुलीमध्ये चांगलेच गुंतले आहेत.

 यामुळे अधिकारी व कर्मचारी संपात, उर्वरित अधिकारी वसुलीला, मग स्वच्छतेकडे कोण बघणार, असा प्रश्न नागरिकांना याचा नाहक त्रास सहन लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक यांचे अंकुश नसल्यामुळे प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष तर करत नाही ना, असा संतप्त प्रश्न येथील नागरिक व व्यापारी विचारत आहेत.

उपस्थित झाला आहे. यामुळे करावा लागत आहे. 

Post a Comment

0 Comments