Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर; तरीही तुरुंगातून बाहेर येण्यास लागणार एवढा वेळ तब्बल सात वर्षांनी आज जामीन मिळाला

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर;

तरीही तुरुंगातून बाहेर येण्यास लागणार एवढा वेळ तब्बल सात वर्षांनी आज जामीन मिळाला

मोहोळ – मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश नागनाथ कदम यांना गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयाच्या वैयक्तिक जात मुचलकावर जामीन मंजूर केल्याने मोहोळ मध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष केला. तब्बल सात वर्षांनी आज जामीन मिळाला आहे.

सन 2014 साली मोहोळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कडून त्यांनी आमदारकी मिळवली होती. त्यांनी आमदारकीची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोहोळ शहरासह तालुक्याच्या विकासाकडे लक्ष दिले होते. उड्डाणपूल ते गवत्या मारुती चौकापर्यंत रस्ते दुभाजक बसविले होते. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली होती.

‘मागेल त्याला पाणी’ व ‘मागेल त्याला रस्ता’ या त्यांच्या सामाजिक उपक्रमास मतदार संघातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. त्यानी मतदार संघात सुमारे 370 बोअर घेतले आहेत, त्या सर्वांना आज तागायत भरपूर पाणी आहे.माजी आमदार कदम यांनी मतदार संघात ‘एसएमएस’ पद्धत राबवली होती.

ज्यांच्या घरी विवाह सोहळा व अथवा कुठलाही कार्यक्रम असेल त्याने कदम यांना मोबाईल वर एसएमएस केला तर अर्ध्या तासात त्यांच्या कार्यक्रम स्थळी पाण्याचा टँकर पोहोच होत होता.

मतदार संघातील नागरिकांच्या सोयीसाठी त्यांनी दीड कोटी रुपयाची बोअरची गाडी खरेदी केली होती, तर दहा मोठे टँकर व काही लहान टँकर नागरिकांना उपलब्ध करून दिले होते. गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून काही गावातील रखडलेले रस्त्याचे प्रश्न त्यांनी चुटकी सारखे सोडविले आहेत.दरम्यान अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी त्यांना तुरुंगात जावे लागले.

दरम्यान माजी आमदार कदम यांना अन्य प्रकरणांमध्ये अटक असल्याने त्यांना तुरूंगातुन बाहेर येण्यास वेळ लागणार आहे.त्यांना जेलमध्येच थांबावे लागणार आहे.यावेळी अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments