एका घरातील कपाटातून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
कुजलेल्या अवस्थेत प्लास्टिक पिशवीत मुलीनेचं केली आईची क्रूर हत्या
मुंबई मधील एका घरातील कपाटातून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले होते. कुजलेल्या अवस्थेत प्लास्टिक पिशवीत बंद. वीणा प्रकाश जैन (५३) असे मृत महिलेचे नाव असल्याचे निष्पन्न झाले होते. मृताच्या 22 वर्षीय मुलीवर खुनाचा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या डिसेंबरमध्ये झाली होती. मुलीला अटक करण्यात आली असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे प्रकरण मुंबईतील लालबाग पेरू कंपाऊंड परिसरातील आहे. गुरुवार, 15 मार्च रोजी येथील एका कपाटातील प्लास्टिकच्या पिशवीत महिलेचा मृतदेह आढळून आला. रिंपल प्रकाश जैन असे आरोपी मुलीचे नाव आहे. रिंपल जैनने 12वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
ती तिच्या आईसोबत मुंबईतील लालबाग भागात मामाच्या घरी राहत होती. घरखर्चासाठी काका पैसे द्यायचे. मंगळवारी, 14 मार्च रोजी मामाची मुलगी रिंपल जैन यांच्या घरी गेली. त्यानंतर रिंपलने दरवाजा उघडला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी सांगितले की, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी वीणाला पाहिले नाही.
त्यानंतर रिंपलच्या मामाने जबरदस्तीने दरवाजा उघडला. आतून एक विचित्र वास येत होता, त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी रिंपलच्या घराची झडती घेतली असता,
वीणा जैनचे डोके आणि धड कपाटातून प्लास्टिकच्या पिशवीत बंद केलेले आढळून आले. पाण्याच्या टाकीतून मृतदेहाचे काही भागही सापडल्याचे वृत्त आहे. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.



0 Comments