मोठी बातमी! राज्यात मास्क सक्ती नाही मात्र... राज्य सरकारने नवे आदेश जारी केले.
महाराष्ट्रात आता H3N2 व्हायरसच्या संसर्गाने घबराट पसरली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये २३ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले.
शिंदे यांनी H3N2 संसर्गाबाबत आज बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड व H3N2 हे दोन्ही संसर्गाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. कोरोना व एच३एन२ या व्हायरसच्या प्रसाराची कारणेही सारखी आहेत.
त्यामुळेच कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या आहेत. नवे आदेश खालीलप्रमाणे - गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
सर्दी खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा. दरम्यान राज्यात मास्क सक्ती होणार नाही, असे संकेत सरकारने दिले असले तरी शक्यतो सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.


0 Comments