google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक प्रकार.. बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; 80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल

Breaking News

खळबळजनक प्रकार.. बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; 80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल

 खळबळजनक प्रकार.. बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; 80 महिला रुग्णांचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल 

कोल्हापूर : कोल्हापुरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका बोगस डॉक्टरने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णांचे अश्लील व्हिडीओ तयार केले आहेत.

 यातील सुमारे 70 ते 80 व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसली आहे. याबद्दल तब्बल 400 लोकांनी पत्र लिहीत सदर डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापुरात एका व्यक्तीने वैद्यकीय पदवी नसतानाही दवाखाना सुरु केला. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलांसोबत अश्लील चाळे करायचा. त्यानंतर तो व्हिडीओ क्लिप बनवायचा.

 त्याने हे सर्व व्हिडीओ त्याच्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले होते. अश्लील चाळे करतानाच्या तब्बल 80 क्लिप त्याने लॅपटॅपमध्ये ठेवल्या होत्या. मात्र त्याचा लॅपटॉप त्याने दुरुस्तीसाठी पाठवला आणि या घटनेचा भांडाफोड झाला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात

हा बोगस डॉक्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रुग्णालयाची जाहीरात करत होता. त्यामुळे राज्यभरातूनच नाही तर परराज्यातून रुग्ण त्याच्याकडे उपचारासाठी येत होते.

 यामध्ये महिला रुग्णांचा देखील समावेश होता. याचाच गौरफायदा या डॉक्टरने घेतला. त्याने महिलांचे अश्लील व्हिडीओ चित्रीत करून आपल्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवले होते. 

आता हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतु घाबरून कुणीही तक्रार केली नव्हती. मात्र त्यासंबंधी चारशेहून अधिक निनावी पत्रे समोर आले. कोल्हापूरमधील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि पोलिसांना ही पत्र पाठवली गेली आहेत.

Post a Comment

0 Comments