google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपालिकेतून फी सर्वसामान्यांना न परवडणारी.. माजी नगराध्यक्ष मा.अनिलभाऊ खडतरे

Breaking News

सांगोला नगरपालिकेतून फी सर्वसामान्यांना न परवडणारी.. माजी नगराध्यक्ष मा.अनिलभाऊ खडतरे

 सांगोला नगरपालिकेतून फी सर्वसामान्यांना न परवडणारी..

माजी नगराध्यक्ष मा.अनिलभाऊ खडतरे 

सांगोला नगरपालिकेतून मिळणाऱ्या मालमत्ता उतारा, येणे बाकी दाखला, वारसा नोंद, हस्तांतरण - बक्षीस पत्र आदी कागदपत्राची मागणी केल्यानंतर इतर नगरपालिकेपेक्षा सांगोला नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकेकडून म्हणून अधिक रक्कम आकारली जात आहे. 

नगरपालिकेची ही कागदपत्रांची पूर्तता करताना रक्कम सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही. कोरोना त्यानंतर अतिवृष्टी अशा परिस्थितीत अद्याप नागरिक सावरलेला नाहीत. परिणामी शहर व उपनगरातील बाजारपेठा अद्यापही पूर्ववत सुरळीत झाल्या नाहीत. बाजारपेठेत आज ही मंदी आहे.

 आशा बिकट परिस्थितीत नगरपालिकेने कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी फी च्यानगरपालिकेने कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी फीच्या आकारणीमध्ये केलेली वाढ हे नागरिकांना आर्थिक भुर्दंड घालणारे असून याबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा

 आणि लावलेले दर कमी करावेत अशी मागणी माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ खडतरे यांनी केली आहे. शहराची आणि तालुक्याची परिस्थिती अतिशय आर्थिक दृष्ट्या बिकट झाली आहे. नोटबंदी नंतर लगेच कोरोनामुळे दोन वर्ष अतिशय संकटात गेली आहेत. 

त्यानंतर तालुक्यातील सर्व डाळिंब बागा ज्यांची ख्याती संपूर्ण भारतात नव्हे तर देशात होती त्या डाळिंब बागा आज संपूर्ण उध्वस्त झाल्या आहेत.

 शासनाने तुकडे बंदी केल्याने छोटे मोठे खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. अशी अनेक संकटे आल्याने बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला सांगितले आहे. आहे.

 परंपरेने दुष्काळी तालुका म्हणून तालुक्याचे नाव लौकिक आहे, त्यातच ह्या सर्व गोष्टींची अधिकची भर पडली त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग, कष्टकरी कामगार वर्ग, व्यापारी नोकरदार वर्ग अगदी मेटाकुटीला आले आहेत. 

या सर्व बाबींचा विचार करून नगरपालिका प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता करताना लावलेली फी कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा दरम्यान, कायदेशीर बाबीचा विचार करून समन्वयाने जनतेच्या हिताचे निर्णयघ्यावेत. त्यातून शहरातील जनतेला दिलासा मिळावा हीच माफक अपेक्षा असल्याचे ही माजी नगराध्यक्ष

अनिलभाऊ खडतरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments