google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या 49 व्या पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यात सर्वत्र मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Breaking News

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या 49 व्या पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यात सर्वत्र मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या 49 व्या पुण्यतिथी निमित्त

सांगोला तालुक्यात सर्वत्र मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन  

सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या 49 व्या पुण्यतिथी निमित्त सांगोला तालुक्यात सर्वत्र मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले 

असल्याची माहिती कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील प्रतिष्ठानचे डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील यांनी दिली. या शिबिराचे उद्घाटन मंगळवार दि 28 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरी येथे होणार आहे. 

मोबाईलचा अतिवापर तसेच वाढत्या वयाचा प्रभाव व अन्य कारणांनी तरुण व वयोवृद्ध नागरिकात डोळ्यांच्या आजाराविषयी समस्या वाढू लागल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन सांगोला तालुक्यात डोळ्यांच्या संदर्भातीलएकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांनी घालून दिलेल्या

 आदर्शनुसार व मा. आम दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उद्या मंगळवार 28 रोजी मांजरी व परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

तसेच बुधवार 29 रोजी शिवणे परिसरातील नागरिकांसाठी मुक्ताई मंगल कार्यालय शिवणे येथे तसेच नाझरे परिसरातील नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियाशिबिराचे आयोजन केले आहे. 

गुरुवार 30 रोजी अकोला व परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी अकोला येथे शिबिर होणार आहे. तर याच दिवशी महूद परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी महूद येथे या शिबिराचे आयोजन केले आहे.

 शुक्रवार दि. 31 मार्च रोजी जवळा आणि परिसरातील गावांसाठी जवळा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे. याच दिवशी कोळा परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी कोळा येथे हे शिबिर आयोजित केले आहे.

 तर सोमवार दि. 3 एप्रिल रोजी घेरडी परिसरात असणाऱ्या गावातील रुग्णांसाठी ग्रामपंचायत सभागृह घेरडी येथेसदरचे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

सर्वच ठिकाणी हे नेत्र तपासणी शिबिर सकाळी 10 पासून सुरू होईल. या शिबिरात सहभागी होणारे सर्व रुग्ण संपेपर्यंत सदरचे शिबिर सुरूच राहील. या शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्णांची नामांकित तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी होईल.

Post a Comment

0 Comments