मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल: नितीन गडकरी
नागपूर: मी जलसंवर्धन, वेस्टलँडसारख्या कामांसाठी अनेक प्रयोग करत आहे. मी हे प्रयोग जिद्दीने करतो. मी सर्व कामं प्रेमाने नाहीतर ठोकून करतो. मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी पण निवडून आलो. लोकांना मी आता सांगतो, तुम्हाला पटलं तर मत द्या.
मी आता फार लोणी लावायला तयार नाही. तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, नाहीतर कोणीतरी निवडून येईल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना रविवारी ख्यातनाम वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात बोलतानाही गडकरींनी परत समाजकारणात जास्त रस असल्याचे सांगितले. गडकरी म्हणाले की, मी एकदा लोकांनाही सांगितले की पुष्कळ झाले आता, मी पण निवडून आलो. लोकांनो, तुम्हाला पटले तर मत द्या, नाहीतर नका देऊ.
मी आता फार लोणी लावायला तयार नाही. खरे म्हणजे मलाही या कामाला जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरींनी जाहीरपणे सांगितले.वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गडकरींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.


0 Comments