धक्कादायक : चौथी-पाचवीतली लेकरंही आता मावा खाताहेत अन दारू पिताहेत बालवयातही व्यसनाचे प्रमाण वाढले
सोलापूर आजूबाजूचे वातावरण, घरातील शेजारच्या एखाद्या व्यक्तीला बघून, मित्रांबरोबर केवळ मजा करण्यासाठी, टाइमपास म्हणून, एकदा अनुभव घेऊन बघू असा विचार करून अनेकजण दारूच्या आहारी जात आहेत. एवढेच नव्हे तर मावा, गुटखा, तंबाखू चघळणाऱ्या तरुणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण सारखेच आहे. चौथी पाचवीमधील मुले मावा, गुटखा, तंबाखू, दारूच्या आहारी गेल्याची धक्कादायक माहिती 'लोकमत'च्या पाहणीत समोर आली.
मुलांमध्ये व्यसनांची सुरुवात साधारणतः पौगंडावस्थेतच होते. त्याचवेळी त्याला व्यसनाच्या बाबतीत अटकाव झाला तर मग ते भविष्यात शक्यतो कोणत्याही व्यसनाच्या आहारी जात नाहीत,
बन्याचवेळा व्यसन हे जवळच्या व्यक्तीकडूनच लागण्याची शक्यता जास्त असते. घरातील व्यक्तीला व्यसन असल्यास त्याचा परिणामही मुलांवर होतो. पालकांनी वेळीच काळजी घ्यावी, मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
पालक म्हणून आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे.व्यसनामुळे | होणारे आरोग्यावर वाईट परिणाम धूम्रपान व व्यसन केल्याने हृदयरोग, कॅन्सर, किडनी आणि फुप्फुसांचे आजार अशा गंभीर समस्या उद्भवतात.
धूम्रपानामुळे फुप्फुस, स्वरयंत्र, अन्ननलिका व श्वसनलिकेचा कर्करोग होतो. स्वादुपिट, मूत्राशय, मूत्रपिंड, मूत्रनलिका, प्लीहा व गर्भाशयमुख कर्करोग होण्यासही कारणीभूत ठरतात. रस्त्यांवर होणारे अनेक अपघात व्यसनाधीन असल्यानेच होतात.संकल्प करा अन् व्यसनमुक्त व्हा..
आपले जीवन आपण कशाचा आहारी जाऊन का वाया घालवायचे, काही क्षणांच्या फसव्या सुखासाठी आपण आपले जीवन पणाला लावत नाही ना, याचा विचार करायला हवा.
व्यसनासाठी वेळ, पैसे. आरोग्य सर्व काही पणाला लावणे खरंच योग्य आहे. का हा प्रश्न विचारायला हवा. व्यक्तीसाठी वेळ खूप मौल्यवान आहे. चला तर संकल्प करूया. आपल्या पुढच्या पिढीला व्यसनमुक्त करुया.
चौकट
• प्रेम प्रकरणातील अपयश कर्जबाजारीपणा, बेरोजगारपणा कौटुंबिक वाद-विवाद
चेष्टामस्करीत स्पर्धा लावणे तरुण व्यसनाच्या आहारी का जातात?स्पर्धा परीक्षेतील अपयश व्यसनाधीन मित्र, जवळच्या लोकांची संगत
तरुण पिढी ही समाजाचे आशास्थान आहे. मात्र या तरुण पिढीवर संस्कार नसल्याने ती व्यसनाच्या आहारी जात आहे. वेळीच त्यांना रोखणे काळाची गरज आहे. नाही तर तरुणांची संख्या कमी होईल. - डॉ. ऋषभ मंडलेच सोलापूर
कोणतेही काम करता विलासी ऐश्वर्यसंपन्न जीवनाची स्वप्ने पाहणारी आजची तरुणाई झटपट पैसे कमविण्याच्या
हव्यासापोटी मटका, जुगार, लॉटरी अशा वाममार्गाकडे वळून आपले आयुष्य उद्ध्वस्त करीत आहे. हे वेळीच रोखणं गरजेचे आहे. यात पालकांची भूमिका महत्वाची आहे.
- श्याम कदम, सोलापू


0 Comments