google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अमृता फडणवीस धमकी प्रकरणात शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे

Breaking News

अमृता फडणवीस धमकी प्रकरणात शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे

 अमृता फडणवीस धमकी प्रकरणात शरद पवार, उद्धव ठाकरेंची नावे

मुंबई - डिझानर अनीक्षा जयसिंघानी हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांना पाठवलेल्या एका संदेशात तिचे वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, असा दावा मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात केला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल केल्याच्या या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

 कारण अमृता फडणवीस यांना धमकी आणि ब्लॅकमेल करण्याच्या या कटात विविध राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे. अनिक्षाला १६ मार्च रोजी अटक करण्यात आली होती.

 अनिक्षाने तिचे वडिल अनिल जयसिंघानी यांच्यावरील फौजदारी खटला मागे घेण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच देऊ केली असे या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अनीक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्याभोवताली असलेली सुरक्षा भेदून घरातील चित्रफिती तयार करण्याचे धाडस केले. त्यामुळे या कटाचा खोलवर तपास करण्याची आवश्यकता आहे.

 अनीक्षाला जामीन मिळाल्यास ती तपासात अडथळा आणून शकेल तसेच अमृता यांना पुन्हा धमकावण्याची शक्यता आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अमृता फडणवीस धमकी प्रकरणात कोर्टाने सोमवारी संशयित बुकी अनिल जयसिंघानीची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

जयसिंघानीला गुजरातेतून चुलत भाऊ निर्मलसह अटक करण्यात आली होती. या दोघांना सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी. आल्मले यांच्यासमोर हजर करण्यात आले होते. विशेष म्हणजे अनीक्षा जयसिंघानीला सोमवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अमृता फडणवीस यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सट्टेबाज अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनीक्षा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. पण आता पवार आणि ठाकरेंची नावे समोर आल्याने हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे.

Post a Comment

0 Comments