शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन.
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेतर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात इचलकरंजी सायकल क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे शिवाजी शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांनी स्वातंत्रपूर्व काळात केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करून त्यांच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चारुदत्त खडतरे यांनी केले. कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक ,संघटनेचे सदस्य व पदाधिकारी यांनी सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फुले वाहून अभिवादन केले. शेवटी आभार अनिल तारळकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक कामटे संघटनेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments