आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे ज्वलन करून सांगोल्यात भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त
सांगोल्यात शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांकडून रामराजे नाईक निंबाळकरांच्या प्रतिमेचे ज्वलन
सांगोला : निरा देवघर सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळवण देणारे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच विरोधात बोलून हक्काच्या पाण्यासाठी विरोध करणारे विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमेचे ज्वलन करून सांगोल्यात भाजप - शिवसेना कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
यापुढे तालुक्याच्या पाण्यासाठी अडसर करणाऱ्यास ठोसास-ठोस उत्तर दिले जाईल असे आव्हान भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिले. सांगोला तालुक्याचा नीरा देवघरच्या कार्यक्षेत्रात कायदेशीर समावेश करण्यात आला आहे.
यामुळे एकीकडे सांगोल्यात जल्लोष व्यक्त केला जात असतानाच दुसरीकडे जिल्हा तहानलेला ठेवून निरा कालव्यातून माढा मतदारसंघाला पाणी पळवण्याला विचार केला जात आहे. पाणी पळवणाऱ्याला धडा शिकवला जाईल अशी उपरोधक टीका आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.
दुष्काळी सांगोल्याला मिळालेल्या पाण्याबाबत आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रत्यक्षपणे विरोधच केल्याने सांगोल्यात त्यांच्या प्रतिमेचे ज्वलन करून भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात निषेच्या घोषणा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शिवसेनेचे सागर पाटील, दिग्विजय पाटील, दीपक खटकाळे, दादासो लवटे, शिवाजीराव गायकवाड, आनंद घोंगडे यांच्यासह इतर शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
आमच्या हक्काच्या पाण्यासाठी इतरांच्या पोटात का दुखते
वर्षानुवर्षे दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्याला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले. सध्या राज्य सरकार व केंद्र सरकारच्या मदतीने आमच्या हक्काचे पाणी आम्हास मिळवण्यात यश येत असतानाच हे पाणी मिळाल्याने इतरांच्या पोटात का दुखते हे समजत नाही. आमच्या हक्काच्या पाण्याला विरोध करणाऱ्यास आम्ही विरोधच करू
- चेतनसिंह केदार - सावंत, तालुकाध्यक्ष, भाजप.


0 Comments