Breaking News

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने चंद्रशेखर केंगार सन्मानित

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने चंद्रशेखर केंगार  सन्मानित

मुंबई येथील केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कासार शिरसी जिल्हा लातूर येथील या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री चंद्रशेखर केंगारे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत सन्मानित करण्यात आले याबाबत कासार शिरसी भागात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

कासार सिरसी जिल्हा लातूर येथील तरुण पत्रकार व युवा महाराष्ट्र सेनेचे सोशल मीडिया प्रमुख चंद्रशेखर मधुकर केंगा यांना बुधवार तारीख 15 रोजी नेवासा जिल्हा अहमदनगर येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रवींद्र पवार यांच्या हस्ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरवण्यात आले. 

याप्रसंगी या समारंभास सर्वश्री माजी सैनिक साहेबरावजी घाडगे अभियंता चेचर साहेब केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम गाडेकर साहेब केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन जी मोरे यांचे सह अनेक मान्यवर हजर होते

त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत बोलताना केंगार म्हणाली की मी गेली दहा वर्षापासून पुणे येथील बारणे कुटुंबात राहून सामाजिक कार्य केले

 मी स्वर्गीय सौ अर्चनाताई बारणे नगरसेविका पुणे श्री तानाजी भाऊ बारणे संभाजी उत्तमराव बारणे यांचे कुटुंबीयांकडून मला सामाजिक कार्याचा वसा मिळाला तेथूनच मी घडलो मला मिळालेला पुरस्कार ही त्यांची कृपा असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या पुरस्काराबाबत कासार शिरसी येथील ज्येष्ठ पत्रकार शाम मुळजकर  यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

Post a Comment

0 Comments