वामनराव शिंदेसाहेब आदर्श विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी.
सांगोला (प्रतिनिधी)सांगोल्यातील वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरुवातीस प्रशालेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे अरुणतात्या कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विलासराव पाटील सर यांनी शिवजयंतीनिमित्त विलास पाटील मनोगत करताना यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य, विचार डोक्यावर न मिरवता डोक्यात घेण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनी शगुन मुलानी हिच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेत शुभेच्छा देण्यात दिल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी केले यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. शेवटी आभार विठ्ठलपंत शिंदे सर यांनी मानले.


0 Comments