सांगोला पंचायत समिती, सांगोला येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्याचे व चबुतऱ्याचे अनावरण आमदार शहाजीबापू पाटलांनी केले अनावरण
सांगोला पंचायत समिती, सांगोला येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व चबुतऱ्याचे अनावरण
विधानसभा शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केले. सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी बांधव तसेच शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
पंचायत समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा व चबुतरा उभारण्यासाठी बरेच दिवस प्रयत्न सुरु होते. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरच माझ्या हस्ते याचे अनावरण करण्यात येत आहे याचा आनंद आहे. असे प्रतिपादन आमदार शहाजी पाटील यांनी यावेळी केले. .
तसेच जनसंपर्क कार्यालय सांगोला येथे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, उद्योगपती भाऊसाहेब रूपनर व इतर मान्यवर उपस्थित होते.


0 Comments