नवीन चिन्ह घ्या, लोक नवीन चिन्ह स्वीकारतात : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. शरद पवार
केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला देण्याचा निर्णय जाहीर केला.
या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून अनके प्रतिक्रिया येत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रियी दिली आहे. एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही,
तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचे. त्याचा फार काही परिणाम होत नाही, लोक ते चिन्ह स्वीकारतात, असा सल्ला पवार यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे. पवार म्हणाले की, एकदा निकाल आल्यानंतर त्यावर चर्चा करता येत नाही, तो निकाल मान्य करत नवीन चिन्ह घ्यायचे.
त्याचा फार काही परिणाम होत नाही. काँग्रसमध्ये एकदा इंदिरा गांधी हा वाद झाला, त्यावेळी काँग्रेसचे चिन्ह गेले, काँग्रेसने हात हे चिन्ह घेतले आणि लोकांनी ते मान्य केले, आता उद्धव यांनी नवीन चिन्ह घेतले तर ते लोक मान्य करतील, फार परिणाम होत नाही. महिना पंधरा दिवस चर्चा होईल.


0 Comments