google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या;गाईनं मारलं तर..

Breaking News

केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या;गाईनं मारलं तर..

 केंद्र सरकारचा अजब फतवा; म्हणे, 'व्हॅलेंटाईन डे' दिवशी गायीला आलिंगन द्या;गाईनं मारलं तर..

हग डे साजरा करणाऱ्या नेत्याला गायीने दिला लाथ डे 

प्रेमाचा दिवस म्हणून जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ या नावाने साजरा केला जातो. पण केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, मंत्रालयाने हा दिवस ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचे परिपत्रक काढले आहे.

 पण काऊला हग करणे एका भाजप नेत्याला चांगलेच महागात पडले आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

केंद्राने पत्रक काढत हा दिवस गायीला मिठी मारून साजरा करावा, असं आवाहन केले आहे. त्यामुळे भाजपा खासदार जीव्हीएल नरसिंह राव हे हग करण्यासाठी गायीजवळ जाताच गाईने त्यांना लाथ मारायला सुरुवात केली.

 त्यामुळे राव आणि त्यांच्या समर्थकांनी गायीपासून लांब राहणेच पसंद केले. हा व्हिडीओ शेअर करत नेटकरी ‘काऊ हग डे’वरून भाजपाला ट्रोल करत आहेत. पण हा व्हीडीओ जुना असल्याचे सिद्ध झाले आहे. पण तरी देखील नेटकरी हा व्हिडिओ शेअर करत भाजपाला टोले लगावत आहेत.

दरम्यान या आवाहन पत्रकावर सगळीकडून टीका झाल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. भारतीय गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसू बारस हा सण असताना काऊ हग डेची संकल्पना का काढली असा सवाल करण्यात आला होता. त्यानंतर काऊ हग डे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments