google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार शहाजीबापूंवर उगीच जळणाऱ्या विरोधकांसाठी

Breaking News

आमदार शहाजीबापूंवर उगीच जळणाऱ्या विरोधकांसाठी

 आमदार शहाजीबापूंवर उगीच जळणाऱ्या विरोधकांसाठी

मी एक चौकात बसणारा मुलगा आहे. परंतु राजकारणाचा नाद आणि माहिती असणारा कार्यकर्ता आहे.परवा आमच्या चौकात पाच- सहा मुलांचा बापूंच्या राजकारणावरून वादविवाद सुरू होता.हा वादविवाद ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं.

मी शहाजीबापूंचा कार्यकर्ता नाही परंतु गेल्या दोन वर्षात बापूवर विनाकारण जळणाऱ्या विरोधकांची मला कीव येत असल्याने मी हे उघड  आज लिहीत आहे जेणेकरून बऱ्याच सत्य गोष्टी लोकांना माहीत होतील. मी माझं नाव, पक्ष, जात, तुम्हाला सांगणार नाही

 कारण आपल्या सांगोला तालुक्यात मूळ विषयाकडे किंवा विकासाकडे बघण्यापेक्षा त्याच्या पक्षाकडे आणि त्याच्या जातीकडे बघण्याची काही लोकांना जास्त खोड झाली आहे. हे नव विष आपल्या तालुक्यात काही स्वार्थी राजकारण्यांनी जाणीवपूर्वक पेरलं आहे.

आपल्या सांगोला तालुक्याची राजकीय ठेवण गेल्या तीस-चाळीस वर्षात एकच आहे. लोकांना विविध निवडणुकीत गुंतवायचं, ज्या पदाला काडीचीही किंमत नाही आणि अधिकार नाही 

त्या पदासाठी कार्यकर्त्यांना भुलवायचं आणि ऐन निवडणुकीत जातीचे भावनिक कार्ड खेळायचं आणि शेवटच्या दोन दिवसात प्रचंड पैसा वाटायचा. त्यामुळे सांगोला तालुक्याचा विकास काय झाला हा विषय आजपर्यंत ऐरणी वर आलेला नाही. 

त्यामुळे शहाजी बापूंनी जो विकास निधी आणण्याचा सपाटा लावला आहे त्याकडे कोणाचेच लक्ष नाही आणि त्याचे महत्वही विरोधकांना आज वाटत नाही. त्यामुळेच ते विकासावर चर्चा न करता थातूरमातूर टीका आणि अजूनही जातीचे भावनिक कार्डच खेळत बसली आहेत.

आपण जर आता विकासावर आणि तालुक्यात येणाऱ्या निधीवर चर्चा केली तर आपलं पितळ उघड पडेल आणि आपला राजकीय डावही फासेल याची त्यांना भीती वाटत आहे.

आसपासच्या तालुक्यात प्रशासनाच्या अनेक इमारती उभा राहत असताना सांगोला तालुक्यात मात्र गेल्या तीस- चाळीस वर्षात एकही मोठी प्रशासकीय इमारत उभारली नाही. आज ज्या काही महत्त्वाच्या इमारती सांगोला तालुक्यात आहेत त्या इंग्रजांच्या काळातील आहेत. शहाजीबापूंनी नव्या सुसज्ज इमारती उभारण्याचा धडाका लावला आहे.

सांगोला तालुक्यात गेल्या तीस- चाळीस वर्षापासून वीज वितरणाचं एकच सब डिव्हिजन आहे. शेजारच्या माळशिरस व माढा तालुक्यात आपल्या एवढेच वीज ग्राहक असूनही सहा-सहा सब डिव्हिजन त्या तालुक्यात झाली आहेत. 

शहाजीबापूनी सुरुवातीलाच हातीद येथे नवं सब डिव्हिजन आज मंजूर करून आणलं आहे. ही गोष्ट सोपी नाही असे आज वीज कंपनीचे अधिकारीच खाजगीत बोलत आहेत. सांगोला तालुक्यात पावसाळा नसताना बापूंनी माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याची किमया पहिल्यांदाच करून दाखवली आहे. 

जलसंपदा विभागाच्या नव्या मंजूऱ्या बघून विरोधकांच्या तोंडच पाणी पळाले आहे. शिरभावी पाणीपुरवठ्याची नवीन पाईपलाईन थेट वाड्या वस्त्यांवर चालल्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे.

 नगरपालिकेत मंजूर होत असणारा निधी बघून उद्या नगरपालिकेत बापूंची सत्ता आली तर आपलं कसं व्हायचं असा प्रश्न  विरोधकांना पडला आहे. पूर्वीच्या काळात रस्त्यासाठी पाच वर्षात येणारा निधी बापूंनी एका वर्षात आणण्यास  सुरुवात केली आहे.

त्या रस्त्यांची केवळ उद्घघाटनं बापूंनी करायची म्हंटली तरी एक वर्ष पुरणार नाही अशी वस्तूस्थिती आहे. या सुरू झालेल्या प्रचंड कामाबद्दल विरोधक कौतुकाचा एक शब्द काढत नाहीत हे दुर्दैवी आहे.आज राजकारण खूपच कोत्या मनाचे झालेले आहे.

शहाजीबापूंनी सुरू केलेल्या या विकास कामांना रफिक नदाफ हे माजी नगराध्यक्ष चांगली साथ देत आहेत.याबद्दल तालुक्याच्यावतीने त्यांचे मी आभार व्यक्त करतो. खरंतर याबद्दल शहाजीबापूंचे आभार व कौतुक करणे खरे गरजेचे आहे.कारण स्वर्गीय गणपतराव देशमुख यांना साथ देणारे जगन्नाथ तात्या लिगाडे हे साथीदार होते.

 परंतु लिगाडे तात्या यांच्या पाठीमागे मराठा जातीचे राजकीय कार्ड होते आणि ते साधे सरळ होते.परंतु रफिक नदाफ यांच्या पाठीमागे कोणतेही मोठे राजकीय कार्ड नसताना आणि ते कुशल असताना बापूंनी त्यांना साथीदाराचा दर्जा दिला ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्य माणसाला खूप मोठी आणि निर्मळ वाटत आहे.

आज खरंतर एका गोष्टीसाठी तर शहाजीबापूंचे सांगोला तालुक्याने आभार व्यक्त केले पाहिजेत. बापूमुळे आज सांगोला तालुक्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गेलं आहे. नाहीतर यापूर्वी सांगोला तालुका पंढरपूर शेजारी आहे हे लोकांना सांगावं लागत होतं.

 संपूर्ण महाराष्ट्र बापूचं कौतुक करत असताना विरोधक मात्र बापू चेष्टेचा विषय कसा होईल यासाठी प्रयत्न करत होते. असले राजकारण वाईट आहे. एबीपी माझा या टीव्हीवर माझा कट्टा या कार्यक्रमात बापूंनी जे विचार सांगितले त्याचे कौतुक राज्यभर झाले.

 हे कौतुक विरोधकांना पचनी पडले नसले तरी राज्यातील जनतेतून होत असणारे प्रचंड कौतुक व स्वागत त्यांनाही स्वीकारण्याशिवाय आता पर्याय राहिला नाही. बापूंच्या विरोधकांना मला एवढेच सांगायचं आहे की जातीचं भावनिक कार्ड खेळण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर लढा द्या. 

हेच तालुक्याचे आणि तुमच्या फायद्याचा आहे. तुम्ही जर आता जातीचे कार्ड खेळत बसला  तर सर्व जाती आपोआप तुमच्यापासून बाजूला होतील आणि त्याची हवा जर भाळवणी गटात गेली तर बापू पुन्हा तीस-चाळीस हजार मताने निवडून येतील. 

तुमच्या जातीय राजकारणाने बापू पण आतून नक्कीच सुखावत असणार कारण या जातीय राजकारणामुळे त्यांनाही आपोआपच फायदा होत आहे.यामुळे मला वाटते जनतेने या दोन्ही गटातील पुढार्‍यांची चालू असलेली जातीची खेळी लवकर ओळखून सावध झाले पाहिजे नाहीतर तालुक्याचा विकास पुन्हा वाऱ्यावर उडून जाईल.

सांगोला तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांना पण मला सांगावसं वाटतं की तुमच्यातीलच एखाद्या हुशार,अभ्यासू आणि तालुक्याची जाण असणाऱ्या  व्यक्तीला तुम्ही आमदारकीला उभा करा.उगीच घराणेशाहीच्या नादाला लागू नका. घराणेशाहीने तुमचे राजकीय समाधान होईल आणि काही लोकांची राजकीय सोय होईल परंतु तालुक्याचा विकास होणार नाही. 

स्वतःच्या राजकीय स्वार्थापेक्षा  तालुक्याच्या विकास पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या येणाऱ्या पिढीचा  विचार करा. त्या बिचार्‍या भाऊसाहेब रुपनरांना उघड दगा देऊन काय साध्य झालं.तुम्ही राजकारणात मतं घेतली असतील परंतु तुमच्या शेकापच्या तत्त्वज्ञानाचा उघड पराभव झाला त्याचं काय?

 ज्या गांधी-नेहरू घराण्यावर तुम्ही घराणेशाची टीका केली त्याचा शेकापनं शेवटी घराणेशाही स्वीकारली. हे राजकीय पाप नाही का? ज्या जाती निर्मूलनासाठी शेकापचे तत्वज्ञान उभा राहिलं त्याच शेका पक्षात जातीच्या आधारावरच तुम्ही निवडणूक लढवत आहात ही पक्षाच्या तत्त्वज्ञानाची उघड फसवणूक नाही का?

 हे पाप धुऊन काढण्यासाठी आणि तालुक्याच्या खऱ्या विकासासाठी तुम्ही तळगाळात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शेका पक्षातीलच एखाद्या सक्षम कार्यकर्त्याला उमेदवारी द्या. तुमच्याकडे चांगले दुसरे उमेदवार नाहीत का?असा प्रश्न मला पडला आहे. याचा जरूर विचार करा.

दुसरे एक सांगायचं आहे की तुम्ही शहाजी बापूंना विकासाच्या मुद्द्यावर भांडा. उगाच जातीचं राजकारण करत बसू नका.यात तुमच्या पक्षाचे, आपल्या सर्वांचे आणि आपल्या तालुक्याचे खूप मोठे नुकसान आहे.

मी एक चौकातला मुलगा आहे.  चौकातल्या भाषेत लिहले आहे. काही चुकलं तर माफ करा!

Post a Comment

0 Comments