धक्कादायक बातमी.. आता काँग्रेसमध्ये होणार मोठा धमाका
नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये सुरू झालेला कलगीतुरा शांत होण्याची चिन्हे नाहीत. उलट या वादातून मोठा धमाका होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पाठवलेले कथित पत्र या धमाक्यामागील ठिणगी ठरणार आहे.
थोरात यांनी काँग्रेस हायकमांडला पत्र पाठवले असून नाना पटोले यांच्या सोबत काम करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. काँग्रेस पक्षातील आतापर्यंतच्या कामाचा उल्लेखही थोरात यांनी पत्रात केला आहे.
थोरात यांच्याशिवाय पटोले यांच्यावर काँग्रेसमधील इतर आमदार व नेतेही नाराज आहेत. मागील एका निवडणुकीच्या वेळी पटोले यांनी आयत्या वेळी वेगळ्याच उमेदवाराला काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले होते. ऐन वेळी हा उमेदवार पळून गेल्याने पक्षाची नाचक्की झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती नाशिकमध्ये झाली.
त्यासाठी पटोले हेच जबाबदार असल्याचा थोरात यांच्यासह अन्य काही नेत्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पटोले यांच्या कार्यपद्धतीविषयी स्थानिक पातळीवर नाराजी होती. मात्र, आता थोरात यांच्यासारख्या नेत्यांनी ही नाराजी हायकमांडपर्यंत पोहोचवल्याचे समजते. पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर गंडांतर येण्याची चिन्हे आहेत.


0 Comments