सरकारचा मोठा निर्णय ! आता ग्रामपंचायत देईल पाऊसपाणी, हवामानाचा अंदाज
नागपूर : ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायत अंतर्गत सरकारच्या माध्यमातून विविध विकासाच्या तसेच कल्याणकारी योजना राबविण्यात येत असतात.आता आपल्या गावातील ग्रामपंचात मधून हवामान विषयक माहिती सुद्धा मिळणार आहे.
सरकारने ग्रामपंचायत कार्यालयात स्वयंलित हवामान केंद्र उभारणी करण्याची योजना आणखी व्यापक पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला असून १० हजर ग्रामपंचायतीमध्ये स्वयंलित हवामान केंद्र सुरु करण्याची योजना आखली आहे, या बाबतची माहिती आपण जाणून घेऊया…
आता गावातच हवामानाचा अंदाज
ग्रामीण भागात शेतकऱ्यांना स्थानिक हवामानात होंणारे बदल कळत नाही. शेती करण्यासाठी हवामानाची माहिती शेतकऱ्यांना असणे गरजचे असते. परंतु गावपातळीवर अशी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नाही. भौगोलिक परिस्थिनुसार वातावरणात बदल होत असतात. प्रत्येक भागातील हवामान हर भिन्न स्वरूपाचे असते.
पिकाला पोषक असे हवामान असल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न काढता येते. या सर्व बाबींचा विचार करून ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
भारतातील शेती ही पूर्णपणे हवामान व मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाची इत्यंभूत आणि अचुक माहितीमिळाली तर शेतीसाठी पूरक व्यवस्था होईल. ही माहिती शेतकऱ्यांना आता गावातच प्राप्त होणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर १० हजार केंद्र
हवामान आणि पावसाचा अंदाज नसल्याने पिकांचे नियोजन करत येत नाही. स्वयंलित हवामान केंद्र नसल्याने हवामान विषयक माहितीचा अंदाज घेण्यास अडचणी येतात.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यात ग्रामपंचात कार्यालयात स्वयंलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर १० हजार स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
यामुळे पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याची दिशा समजण्यास मदत होणार आहे.राज्यात शासनाच्या मान्यतेने ‘स्कायमेट वेटर सर्विसेस प्रा. ली.’ या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत ‘महावेध’ या प्रकल्पांतर्गत महसूल मंडळ स्तरावर २१२७ स्वयंचलीत हवामान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे.
या केंद्राची मर्यादीत संख्या असल्यामूळे राज्यात केंद्राची संख्या वाढविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर १० हजार उभारण्याच्या सूचना कृषी आयुक्ताकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करण्यात आलेल्या आहेत.
अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी
पावसाची गावनिहाय आकडेवारी मिळावी, अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीची तंत्रशुद्ध माहिती मिळावी, या उद्देशाने राज्यातील ग्रामपंचायतस्तरावर ही स्वयंचलित हवामान केंद्रे बसविण्या येत आहे. पहिल्या टप्प्यात ज्या ग्रामपंचायत क्षेत्राची लोकसंख्या पाच हजारपेक्षा जास्त आहे,
अशा ग्रामपंचायतींमध्ये ही केंद्रे कार्यान्वित केली जात असून नंतर आवश्यकते नुसार हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्यावेळी विमा कंपन्या ह्या स्कायमेट कडूनच सर्व माहिती घेतात. आता ही व्यवस्था मंडळाच्या ठिकाणीच आहे. त्यामुळे तत्परता येत नाही.
आता ग्रामपंचायतीच्या ठिकाणी अशा अत्याधुनिक हवामान केंद्राची उभारणी केली जात आहे. तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, पाऊस याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे कृषीविषयक सल्लाही शेतकऱ्यांना या माध्यमातून देण्यात येणार आहे. विशेषत: पीक विमा नुकसानभरपाईच्या दरम्यान याचा लाभ होणार आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रामूळे प्राप्त होणाऱ्या हवामान विषयक माहितीचा उपयोग पिक विमा योजना, हवामान आधारित फळ पिक विमा योजना, कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन कार्य, आपत्ती व्यवस्थापन या प्रकारच्या विविध उपक्रमासाठी उपयोगी होणार आहे.


0 Comments