google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावकारी जाचाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी घेतलं विष; एकाचा मृत्यू

Breaking News

सावकारी जाचाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी घेतलं विष; एकाचा मृत्यू

 सावकारी जाचाला कंटाळून दोन सख्ख्या भावांनी घेतलं विष; एकाचा मृत्यू

नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात सावकारी जाचाला कंटाळून दोघं भावांनी विष घेतलं असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सावकारी जाचाला कंटाळून वडील आणि दोघं मुलांनी आत्महत्या केल्याची घटना

 नाशिक शहरात ताजी असतानाच नाशिक रोड परिसरात कर्जबाजारीपणामुळे दोघांनी विष घेतल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱ्यांकडे सुसाईड नोट देखील आढळून आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

शहरातील नाशिकरोड भागात असलेल्या भालेराव मळा येथे राहणारे रवी लक्ष्मण कांबळे आणि जगन्नाथ लक्ष्मण कांबळे यांनी कर्जबाजारीपणा आणि सावकारी जाचाला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

 दरम्यान यातील रवी कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर जगन्नाथ कांबळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. सावकाराने पैशासाठी तगादा लावला असून दोघांना बेदम मारहाण केल्याची देखील माहिती मिळाली आहे.

 या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांकडून रास्ता रोको करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नाशिक पुणे रोड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सावकारावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्या करणाऱ्यांकडे सुसाईड नोट देखील आढळून आली आहे. त्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे या संदर्भात अजून काहीच स्पष्ट होऊ शकलेले नाही.

 मागच्या आठ दिवसांपूर्वीच नाशिक शहरात सावकारी जाचाला कंटाळून तिघा शिरोडे पिता -पुत्रांनी आत्महत्या केली होती. या घटनेमुळे नाशिक शहर हादरून गेले होते. आता पुन्हा एकदा खासगी सावकाराच्या त्रासामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे दोघा भावांनी विष घेतलं आहे. त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

0 Comments