प्रेमविवाहानंतर गर्भवती असलेल्या वर्षाची आत्महत्या
अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
वर्षा दीपक नागलोत (वय ३० रा. प्लॉट नं ७८-७८, गजानन कॉलनी, औरंगाबाद ) असे आत्महत्या केलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या. वर्षा या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असताना २०१२ मध्ये त्यांची नातेवाईक असलेल्या दीपक यांच्याशी ओळख झाली.
पुढे त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार असून, या दांपत्याला ८ वर्षांचा मुलगा आहे. वर्षा एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून परतल्या. त्यानंतर बेडरूमध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतले.
त्यांना दीपकसह सासरकडील मंडळींनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. दरम्यान वर्षा यांनी १० वर्षांपुर्वी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून त्यांना हुंड्यामुळे सासरचा जाच होता. मात्र प्रेमविवाह असल्याने त्या माहेरी काही सांगत नव्हत्या.
काल काही तरी वाद घरात झाला होता. त्यावेळी वर्षा यांच्या सासुने वडील शांतिलाल जारवाल (रा. सजरपुरवाडी, ता. वैजापुर) यांना फोन करून वर्षाने काही सांगितले का? अशी विचारणा केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप वर्षा यांच्या वडिलांनी केला आहे.


0 Comments