google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रवादी शिक्षकसंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

Breaking News

प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रवादी शिक्षकसंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

 प्रा.डॉ.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रवादी शिक्षकसंघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

आमदार रोहित दादा पवार माजी आमदार  मा.दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.   

सांगोला (प्रतिनिधी):  पंढरपूर रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.दत्तात्रय काळेल यांना नुकताच 

महाराष्ट्र राष्ट्रवादी शिक्षक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार व सांगोला तालुक्याचे माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेचे नूतन जनरल बॉडी सदस्य मा.दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.        

 डॉ. दत्तात्रय काळेल यांनी गरीब कुटुंबातून ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन आपल्या कार्यातून सामाजिक व शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवलेला आहे .त्यांचे विष्णुपंत दादरे गुरुकुल निवासी विद्यालय आटपाडी येथील मुख्याध्यापक असतानाचे कार्य हे विशेष असे कार्य आहे. 

व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्यावरती केलेली पीएचडी हे सुद्धा खिलारवाडी या छोट्याशा ग्रामीण भागात शिक्षण घेऊन उच्च पदवी प्राप्त केलेली आहे. यापूर्वी डॉ.दत्तात्रय काळेल यांना विश्वगामी शिक्षक संघ व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. 

तसेच निर्मिती विचार मंच कोल्हापूरचा सत्यशोधक पुरस्कार व जनमंगल फाउंडेशन तुळजापूर चा जीवनगौरव पुरस्कारही प्राप्त झाला आहे. तसेच नुकतीच त्यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर राज्यशास्त्र अभ्यास मंडळावरती सदस्य म्हणून निवड झाली आहे .            

या कार्यक्रमासाठी अभिजीत आबा पाटील, कल्याणराव काळे, प्राचार्य डॉ. सी. जे .खिलारे,  नागेश दादा फाटे, गणेश पाटील, युवराज पाटील, सुधीर भोसले, विजयसिंह देशमुख, प्रा.मारुती जाधव, श्रीकांत शिंदे, संदीप मांडवे, सुभाष भोसले, दिगंबर सुडके, आर. डी. पवार सर, लतिफ तांबोळी, अशोक माने व राजश्रीताई ताड तसेच संयोजक संजय शिंदे, संदीप देशमुख, साहेबराव भुसे उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याने डॉ. दत्तात्रय काळेल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments