google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील तीन विद्यार्थ्यांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड..!

Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील तीन विद्यार्थ्यांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड..!


न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील तीन विद्यार्थ्यांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड..!

    न्यू इंग्लिश स्कूल, जुनियर कॉलेज सांगोला मधील इयत्ता बारावी शास्त्र च्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये अभिजीत बनसोडे, आशिष कोकरे व सुशांत येडगे या विद्यार्थ्यांनी शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली 

याबद्दल न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण गावडे यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक क्रीडा शिक्षक प्राध्यापक हिम्मतराव साळुंखे, प्राध्यापक कामाजी नायकुडे, प्राध्यापक अरुण बेहेरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.व भावी स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी संस्था सदस्य प्राध्यापक डॉक्टर अशोक शिंदे, प्राध्यापक दीपक खटकाळे, प्राध्यापक जयंत जानकर,कार्यालयीन अधीक्षक श्री लक्ष्मण बेहेरे सर, उपप्राचार्य हेमंत आदलिंगे, पर्यवेक्षक नामदेव कोळेकर, जुनिअर कॉलेज मधील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments