google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात शिवजयंतीनिमित्त आनंद हॉस्पिटल येथे १९ फेब्रूवारीला गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबीर

Breaking News

सांगोल्यात शिवजयंतीनिमित्त आनंद हॉस्पिटल येथे १९ फेब्रूवारीला गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबीर

 सांगोल्यात शिवजयंतीनिमित्त आनंद हॉस्पिटल येथे १९ फेब्रूवारीला गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबीर

सांगोला : महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील पहिले आय.एस.ओ. मानांकन असलेल्या आनंद हॉस्पिटल मॅटर्निटी,ॲक्सीडेंट, ट्रॉमा सेंटर व २४ तास अत्यावश्यक सेवा-सुविधा पुरविणारे हॉस्पिटल म्हणून प्रसिद्ध

 असणाऱ्या आनंद हॉस्पिटल येथे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले 

असून सदर गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिराचे उदघाटन आमदार शहाजीबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील तसेच पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.

सदर शिबिराची वैशिष्ट्ये :

गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार,मोफत सोनोग्राफी,मोफत रक्त तपासणी तसेच ५ हजार रुपयांत नॉर्मल डिलिव्हरी करण्यात येणार आहे.

 यामध्ये हॉस्पिटल, मेडिकल, भूल खर्च समाविष्ट असणार आहे. शिबिरामध्ये नोंद केलेल्या पेशंटला पुढील उपचारासाठी,शस्त्रक्रियेसाठी सवलत देण्यात येणार आहे.तसेच वेदना विरहित बाळंतपणाची सोय व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी,सांगोला शहर व तालुक्यातील गरोदर महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन जनरल सर्जन व अस्थिरोगतज्ञ डॉ.अमर शेंडे,स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ डॉ.परेश खंडागळे व डॉ.स्वाती खंडागळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments