Breaking News

अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा- शिवसैनिकांची पंढरपूर, सांगोला पोलिसांत तक्रार

 अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा- शिवसैनिकांची पंढरपूर, सांगोला पोलिसांत तक्रार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱयात अपशब्द वापरले व शिवराळ भाषेचा प्रयोग केला.

त्यामुळे अमित शहा यांच्यावर कलम 153(अ), 499, 500, 506 नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पंढरपूर आणि सांगोल्यातील शिवसैनिकांनी पोलिसांकडे केली आहे.

जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी पंढरपूर शहर पोलिसांकडे तक्रारीचे पत्र दिले आहे. अमित शहा यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात शांततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावनेला हानी पोहोचली असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, तालुकाप्रमुख संजय घोडके, शहरप्रमुख रवी मुळे, पंढरपूर शहर समन्वयक माउली अष्टेकर, युवा सेना उपजिल्हा युवा अधिकारी अक्षय माने, शहर युवा अधिकारी श्रीनिवास उपळकर, 

उपशहर युवा अधिकारी तानाजी मोरे, दिगंबर सावंतराव, विनय वणारे, अविनाश वाळके, बाबा अभंगराव, विशाल डोंगरे, प्रदीप बडवे, पिंटू गायकवाड आदी उपस्थित होते. सांगोल्याचे तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांतर्फे सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments