Breaking News

सांगोला घेरडी चोरीचा बनाव! फिर्यादीच आरोपी निघाल्याचे उघड घेरडी पंपावर चोरी; दोन लाख हस्तगत

 सांगोला घेरडी चोरीचा बनाव! फिर्यादीच आरोपी निघाल्याचे उघड घेरडी पंपावर चोरी; दोन लाख हस्तगत

सांगोला घेरडी (ता. सांगोला) येथील पेट्रोलपंपावरील सुमारे दोन लाख १६ हजार रुपये रोकड चोरीप्रकरणाचा पेट्रोलपंपावर चोरलेले सुमारे दोन सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लाख १६ हजार रुपये हर्षद सोनावणे अवघ्या दहा तासांच्या आत छडा लावला.

त्याच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या फिर्यादी हर्षद गजानन सोनवणे (रा. जागेत खड्डा खोदून पुरून ठेवले होते व घेरडी) यानेच चोरीचा बनाव केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी हर्षद सोनवणेला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरलेले सुमारे दोन लाख १६ हजार रुपये हस्तगत केले आहेत. त्यास आज गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले.

डोक्याला कानटोपी व तोंडाला रुमाल बांधून स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या अज्ञात चौघांनी पेट्रोल पाहिजे असे म्हणत पंपावरील कामगाराच्या गळ्याला चाकू लावून लॉकरमधून सुमारे दोन लाख १६ हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास घडली होती.

याबाबत कामगार हर्षद सोनवणे याने पोलिसांत चौघांविरुद्ध फिर्याद दिली होती. दरम्यान, घटनेची माहिती व फिर्याद घेऊन सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप पोलिस पथकासह शाम पेट्रोलपंपावर दाखल झाले.

यावेळी पोलिसांच्या पथकाने फिर्यादी हर्षद सोनवणे व कामगार चैतन्य सरगर यांच्याकडे वेगवेगळी सखोल चौकशी केली. यावेळी हर्षद याच्याकडे विचारपूस केल्यानंतर तो बुचकळ्यात पडला व त्यानेच प्लॅन करून चोरीचा बनाव केल्याची कबुली दिली, तर कामगार चैतन्य सरगर याने सदर कॅश चोरीचा प्रकार घडला नसून तो हर्षदने बनाव केल्याचे सांगितले.

घरामागे खड्डा खोदून ठेवले पैसे

पेट्रोलपंपावर चोरलेले सुमारे दोन लाख 16 हजार रुपये हर्षद सोनावणे त्याच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून पुरून ठेवले होते व कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याच्यावर गवत टाकले होते. पोलिसांनी पंचांसमक्ष सदर रोकड हस्तगत केली आहे.

ही कामगिरी सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलि निरीक्षक सुहास जगताप, पीएसआय शैलेश खेडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक खाजा मुजावर,पोलिस हेडकॉन्स्टेबल मोहन मनसावाले, नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, अक्षय दळवे, अक्षय डोंगरे, चालक समीर शेख यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments