Breaking News

सांगोला तालुक्यामध्ये तालुक्यात 44 हजार 500 कार्डधारकांना या स्वस्त धान्याचा लाभ भेटणार तहसीलदार मा.अभिजीत पाटील

 सांगोला तालुक्यामध्ये तालुक्यात 44 हजार 500 कार्डधारकांना या स्वस्त धान्याचा लाभ भेटणार

तहसीलदार मा.अभिजीत पाटील

सांगोला/ प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाच्या रेशन कार्ड शिधा वाटपाबाबत 22 फेब्रुवारी रोजी निर्णय घेऊन दिवाळी सारखे शंभर रुपयाचे शिधा किट येणाऱ्या गुढीपाडवा व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुद्धा देण्याच्या निर्णय घेतल्याने सांगोला तालुक्यामध्ये 44 हजार 500 कार्ड धारकांना याचा लाभ भेटणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिली.

तसेच तालुक्यात 44 हजार 500 कार्डधारकांना या स्वस्त धान्याचा लाभ भेटणार आहे. त्याअंतर्गत सुमारे 20 लाख नागरिक येतात. या कार्डधारकांना  स्वस्त धान्याचा लाभ भेटणार आहे.

सांगोला तालुक्यामध्ये 44 हजार पाचशे रेशन कार्ड धारकांना लाभ भेटणार आहे तसेच काही रेशन कार्डधारक यापासून वंचित राहणार आहेत. परंतु एक बाजू पाहता अशा प्रकारचे शंभर रुपयाचे रेशनला किट देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात आहे

 अशी ही चर्चा सांगोला तालुक्यामध्ये रेशन संदर्भात केली जात आहे एका बाजूला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढत आहे. यासाठी एमआयडीसी मोठ्या कंपन्या होणे आवश्यक आहे .

त्यामुळे तरुण वर्गाला कायमस्वरूपी नोकरी मिळून रोजगाराची सुविधा उपलब्ध होईल परंतु अशा मूलभूत आणि ठोस भूमिका हे सरकार घेताना दिसत नाही. शंभर रुपयाच्या किटमध्ये किरकोळ रेशन बाजार येतो यामध्येच नागरिक खुश आहेत. 

दुसरी बाजू पाहता प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढून अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने रेशन दुकानांमध्ये शंभर रुपयाचे किट देऊन उघडपणे सरकार नागरिकांची फसवणूक करत आहे अशी चर्चा सांगोला शहरांमध्ये सुरू आहे.

Post a Comment

0 Comments